इम्‍प्रूव्ह युवरसेल्फ : रहस्य निरामय दीर्घायुष्याचे...

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 13 February 2020

माझे काका नुकतेच वयाच्या ९२व्या वर्षी गेले. दोन वर्षांपूर्वीच नवी दिल्लीत त्यांचा ९०वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. मीही या कौतुकसोहळ्याला आवर्जून उपस्थित होतो. या वेळी काकांच्या दीर्घायुष्याबद्दल चर्चा सुरू होती. त्यांना चार गोष्टींमुळे आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभले, असे लोक म्हणत होते. मलाही या निमित्ताने त्या शिकायला मिळाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) तब्बल सात दशकांमध्ये त्यांनी क्वचितच मॉर्निंग वाक चुकवला. (स्वयंशिस्त)

2) शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक खाण्याच्या मोहाला ते कधीही बळी पडले नाहीत. जिभेचे फारसे चोचले पुरवले नाहीत.(स्वनियंत्रण)

3) ते सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून दूर राहिले. (स्वनियंत्रण)

4) दुसऱ्या दिवसाच्या स्वागतासाठी ते कायम उत्साही असायचे. ते कधीही निवृत्त झाले नाहीत. आपल्या दुकानावर नियमित जात होते. ते नेहमीच केंद्रित राहिले. (स्वयंशिस्त आणि केंद्रित राहण्याची वृत्ती)

प्रत्येकाला जीवनात यशस्वी होण्याची आणि सशक्त, दीर्घायुषी जगण्याची इच्छा असते. त्यासाठी स्वयंशिस्त, स्वनियंत्रण आणि विशिष्ट गोष्टींवर केंद्रित राहण्याच्या वृत्तीखेरीज दुसरा कोणता पर्याय आहे का? या सर्व गोष्टींची सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर ‘आजपासून’ असे आहे. आजकाल बदलती जीवनशैली, बेशिस्त, जंकफूड आदी विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे. पूर्वी साधारणपणे पन्नाशीनंतर दिसणारे मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आता तिशीतच होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी ‘यंगस्टर्स’ या चार गोष्टींचे अनुकरण करू शकतात. त्या इतरांसाठीही फायदेशीरच आहेत. त्यासाठी, तुम्हा सर्वांना शुभेच्छा. 
- बी हेल्दी, बी हॅप्पी...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on The secret lies in longevity