इम्प्रूव्ह युअरसेल्फ : प्रोत्साहनाचे 'टॉनिक'

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 7 May 2020

मी ११ वर्षांचा होतो, तेव्हाचा एक प्रसंग. मी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. माझ्या भावाचे लग्न होते. यावेळी मला प्रोत्साहन देत कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी गाणे म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी एक गाणे म्हटले. ते संपताच मी उत्सुकतेने सर्वांकडून टाळ्या वाजविल्या जाण्याची वाट पाहत होतो. अशातच यावेळी उपस्थित असलेल्या एक नातेवाईक म्हणाले, ‘‘नाही, तू हे गाणे व्यवस्थित म्हटलेले नाही.

मी ११ वर्षांचा होतो, तेव्हाचा एक प्रसंग. मी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. माझ्या भावाचे लग्न होते. यावेळी मला प्रोत्साहन देत कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी गाणे म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी एक गाणे म्हटले. ते संपताच मी उत्सुकतेने सर्वांकडून टाळ्या वाजविल्या जाण्याची वाट पाहत होतो. अशातच यावेळी उपस्थित असलेल्या एक नातेवाईक म्हणाले, ‘‘नाही, तू हे गाणे व्यवस्थित म्हटलेले नाही. तू ते अशा प्रकारे म्हणायला हवे,’’ असे म्हणत त्यांनी स्वत:च आपल्या पद्धतीने ते गाणे म्हणण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला ते आजबात आवडले नाही. खरेतर त्या क्षणी मला ते नातेवाईकही आवडले नाहीत. त्यानंतर मी अनेक वर्षे त्यांच्याशी आपुलकीचे नाते विकसित करू शकलो नाही, हेही सत्यच. त्याचप्रमाणे, मला त्याची कधी गरजही वाटली नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकीचे ठरविता किंवा त्याचा आवाज किंवा कल्पना चोरता, मग ती व्यक्ती तुमचा मित्र असो, नातेवाईक, सहकारी किंवा इतर कुणीही असो. अशावेळी क्षणभर थांबा आणि स्वत:लाच तपासा. या क्षणात तुम्हाला आपण हे करायला नको, याची जाणीव होईल.

त्याचप्रमाणे, इतरांच्या सादरीकरणाचे कौतुक करणे अधिक चांगले ठरेल, हेही तुमच्या लक्षात येईल. कारण, अशा प्रकारे कौतुक करून तुम्ही त्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास वाढवत असता. त्यानंतर त्यांच्यामधील कलागुण फुलतील तेव्हा त्या व्यक्ती प्रोत्साहन दिल्याबद्दल नेहमीच तुम्हाला आठवणीत ठेवतील. त्याचप्रमाणे, अनेकवेळा अशा प्रकारचे क्षण तुमच्या नात्याचे भविष्यही ठरवत असतात. त्यामुळे आजपासून कोणावर अशी टीका करू नका. प्रत्येकाची प्रशंसा करा. त्यांना परफॉर्मन्स दाखविण्यासाठी प्रोत्साहित करा. 

सध्या लॉकडाउनमुळे तुमचे अनेक नातेवाईक, मित्र-मैत्रिणी ऑनलाइन प्रेझेंटेशन करत असतील, अशावेळी त्यांचे कौतुक करायला काय हरकत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on A tonic of encouragement