इम्प्रूव्ह युअरसेल्फ : वादविवाद करताना...

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 5 March 2020

एके दिवशीची गोष्ट. मी त्या दोघींना एकमेकांशी वाद घालताना ऐकू शकत होतो. त्या एका स्टार्ट अपचे संस्थापक होते. मी त्यांचे बोलणे ऐकत होतो. ते डेस्कच्या दुसऱ्या बाजूला बसले होते. त्यांना मदत करण्याच्या हेतूने मी माझे इयरफोन्स उचलले. मी त्यांच्यात मध्यस्थी करणार तितक्यात त्यांच्यातील एका महिलेने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ती मला म्हणाली, ‘मला माफ करा. आम्ही दोघीही सारख्याच आहोत. आम्ही खूप वाद घालतो.’ तिचे बोलणे ऐकून मी म्हणालो, ‘ठीक आहे. वाद अल्पकालीन असतात. ते करणाऱ्यांचा आवाज खूप चढत नाही आणि या वादाची निष्पत्ती सकारात्मक असते, तोपर्यंत तो घालणे छानच असते.’ त्यावर ती म्हणाली, ‘खरेतर, आमचे वाद अल्पकालीनच असतात पण ते वारंवार होतात.’ त्यानंतर एकच हास्य पसरले. मी म्हणालो, ‘हे छानच आहे. परिणामांसाठी वाद घालत राहा. मात्र, कोणत्याही सकारात्मक निष्पत्तीशिवाय दीर्घकाळ वाद होत असेल, तर थांबणेच श्रेयस्कर. अशा वेळी काही काळ शिथिल व्हा.

ताजेतवाने होऊन पुन्हा विचारांची देवाणघेवाण सुरू करा. कोणत्याही उपाय किंवा तोडग्याशिवाय वाद घालणे म्हणजे वेळ, ऊर्जा निव्वळ वाया घालवणे होय. खरेतर हा एक प्रकारचा गुन्हाच होय. तुम्हीच तुमच्यावर आणि तुमच्या व्यवसायावर परिणाम केल्यासारखे आहे. हे माझे नेहमीप्रमाणेच स्पष्ट मत आहे.’ त्या दोघीही माझे बोलणे लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांना मी काय म्हणतो ते समजलेही असावे. आपण सगळेच एकमेकांशी कोणत्या तरी कारणावरून वाद घालत असतो. या पुढे तुम्हालाही वाद घालण्यासाठी एक दिशा मिळाली असेल, अशी आशा करतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on While arguing