इंग्रजी शिका : ENGLISH START WRITING

English-Learn
English-Learn

असं म्हटलं जातं ‘If you want to change the world, pick up a pen and START WRITING.’ लेखन कौशल्याचे महत्त्व आपण पाहात आहोत. लेखन इतरांसाठी केले जाते, तसेच ते स्वतःसाठीही केले जाते. बऱ्याच वेळा मनातील भावना प्रत्यक्षपणे समोरासमोर बोलून दाखवता येत नाहीत. योग्य शब्द न सुचल्यामुळे नक्की काय म्हणायचे आहे, ते सांगताही येत नाही. अशावेळी आपल्या मनात आहे तशा भावभावना कागदावर उतरवून काढणे सहज शक्य असते. लेखनाच्या माध्यमातून आपल्याला सहज व्यक्त होता येते. लेखन कौशल्याचा टप्प्याटप्प्याने सराव कसा करता येईल, ते आज आपण पाहू. 

Write daily-diary - इंग्लिश भाषेतून लेखनाची सुरुवात करायला डायरीसारखे (रोजनिशी) दुसरे साधन नाही. दिवसभरातील घडामोडी डायरीत लिहिण्याचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे. सुरुवातीच्या काळात इंग्लिश भाषेतून लेखन करताना आत्मविश्‍वास कमी असतो. चुका होतील या भीतीने लेखन टाळतो किंवा मनासारखे लिहू शकत नाही. ते लेखन सार्वजनिक होणार असल्यास विचारूच नका. सुरुवातीला स्वतःपुरते लेखन मर्यादित ठेवल्यास ते करणे सोपे जाईल. इंग्लिश भाषेतून रोजनिशी लिहिण्याचा आणखी एक फायदा आहे. रोजच्या घटनांचे वर्णन करताना बऱ्याचदा वाक्यरचना सारखीच असते. वापरले जाणारे शब्द, क्रियापदे, विशेषणे जवळपास सारखीच असतात. एकदा ते शब्द पक्के झाले की मग सातत्याने डायरी लिहीत राहणे सोपे जाते. डायरी लिहिण्यात सातत्य आल्यावर नवीन शब्द, नवीन वाक्यरचना यांचा हळूहळू वापर करावा. विविध क्रियापदांसाठी, दैनंदिन व्यवहारात न वापरली जाणारी इतर क्रियापदे वापरायचा प्रयत्न करावा. 

उदा. Yesterday l saw many beautiful flowers. या वाक्यातील saw या क्रियापदाऐवजी watched, observed, examined, witnessed, spotted, beheld, glimpsed, gazed, inspected, noted, surveyed, scrutinized यासारख्या नेमक्या क्रियापदांचा तर beautiful या विशेषणाऐवजी pretty, lovely, charming, alluring, mesmerizing, appealing, attractive,  fascinating, exquisite, divine, admirable, यासारख्या विशेषणांचा वापर करता येईल. या किंवा यासारख्या अनेक शब्दांपैकी एक शब्द जो वाक्यात चपखलपणे बसेल, असा शब्द वापरला म्हणजे आपले लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. अशा नवीन शब्दांचा प्रयोग करत राहिल्यास आपली शब्दसंपत्ती वाढायला मदत होईल. यासाठी Thesaurus आणि Dictionary वापरणे उत्तम. Smartphoneमध्ये यांची Apps सुद्धा वापरता येतील.

Thesaurusचा वापर करून त्या शब्दासाठी असणारे पर्यायी शब्दप्रयोग वाचता येतील आणि Dictionaryचा वापर करून प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ समजून घेता येईल. त्यानंतर त्यापैकी योग्य शब्दाचा वापर अचूकपणे करून घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com