esakal | इंग्रजी शिका - Let's Start Speaking!
sakal

बोलून बातमी शोधा

English

आपल्या यादीतील चार कौशल्यांपैकी महत्त्वाचे कौशल्य म्हणजे बोलणे. अर्थातच इंग्लिशमधून! या जागतिक भाषेतून बोलण्यासाठी उपयुक्त अशा इतर कौशल्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. आपण सारेजण इंग्लिश ऑडिओज, इंग्लिश गाणी ऐकत आहातच. त्याचबरोबर इंग्लिश पुस्तके, लेख, कथा वाचत आहात. इंग्लिशमधून रोजची डायरी आणि इतर सोपे सोपे लेखन तुम्ही सुरू केलेले आहेच.

इंग्रजी शिका - Let's Start Speaking!

sakal_logo
By
शैलेश बर्गे

आपल्या यादीतील चार कौशल्यांपैकी महत्त्वाचे कौशल्य म्हणजे बोलणे. अर्थातच इंग्लिशमधून! या जागतिक भाषेतून बोलण्यासाठी उपयुक्त अशा इतर कौशल्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. आपण सारेजण इंग्लिश ऑडिओज, इंग्लिश गाणी ऐकत आहातच. त्याचबरोबर इंग्लिश पुस्तके, लेख, कथा वाचत आहात. इंग्लिशमधून रोजची डायरी आणि इतर सोपे सोपे लेखन तुम्ही सुरू केलेले आहेच. हे सारे तुम्ही नियमितपणे आणि सातत्याने सुरू ठेवल्यास इंग्लिशमधून बोलणे, इंग्लिशमधून इतरांशी संभाषण करणे तुम्हाला नक्कीच सोपे जाणार आहे. इंग्लिश बोलण्यासाठीच्या महत्त्वाच्या बाबी, तसेच टप्प्याटप्प्याने करावयाचे बदल आता आपण पाहणार आहोत. 

1. Just start 
इंग्लिश बोलताना चुका होतील, या भीतीने आपण बोलतच नाही.  प्रवासाला सुरुवातच नाही केली, तर पोचणे शक्य होईल का? Remember, mistakes are stepping stones to success. And we all know if we are committing mistakes that means we are trying something new. चुकतो तोच शिकतो. फक्त चूक सुधारून पुढच्या वेळी योग्य पद्धत वापरली पाहिजे. इंग्लिश भाषेतून प्रभावीपणे बोलण्यासाठी, म्हणजेच आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याची पहिली पायरी म्हणजे सुरुवात करा. Whatever English you know or you can speak, use it. 
It is rightly said, USE or LOSE. आपल्याला माहीत असलेली बरीच Expressions वापरली पाहिजेत. We know, Slow and steady wins the race. इंग्लिशमधून लहान लहान वाक्यरचना वापरतच आपण fluent English बोलायला शिकणार आहोत. ज्याला बऱ्याच वेळा magic Expressions म्हटले जाते, अशी expressions वापरून त्याच्यात हळूहळू नवीन वाक्यांची भर घालत शिकणे उपयुक्त ठरेल. काही माहिती असलेली expressions पाहू या. फक्त विचार हा करायचा आहे की, आपण यापैकी किती वाक्यरचना सहजपणे वारंवार वापरतो.  

पुढे काही उदाहरणे पाहू...
उदा. Good morning, Have a nice day. 
Good afternoon, Have a nice a time.
Good evening, Good night.
How are you? I am fine. What about you? I am also fine. 
Excuse me. Sorry to disturb you.
Thank you very much.

2. Asking for things 
एखादी वस्तू हवी असेल, तर इंग्लिशमधून अनेक प्रकारे मागता येते. 
उदा ः पेन मागण्यासाठी ः Pen please.
Will you give me your pen, please?
Excuse me, may I have your pen, please?
Are you kind enough to get me your pen, please?
Could you give me your pen, Please?
May I get your pen please?
सर्वांत शेवटच्या वाक्यात pen ऐवजी इतर वस्तूंचा उल्लेख करून वस्तू मागण्याचा प्रयत्न करा बरं! 
जसे May I get a bottle of handwash please? 
येथून पुढे कोणतीही वस्तू मागताना या प्रकारच्या वाक्यरचनांचा वापर करा.