इंग्रजी शिका : वाचन मनाचा व्यायाम

Education
Education

वाचन ही क्रिया एवढी महत्त्वाची आहे की, त्यासाठी लिहू/वाचू तेवढं कमीच आहे. मागच्या लेखाचा ‘वाचाल तर वाचाल, वाचवाल सुद्धा’ या लेखाचा हा उत्तरार्ध.
It is said, ‘Reading is to the mind what exercise is to the body.’ थोडक्यात, वाचन म्हणजे मनाचा व्यायाम, बुद्धीला चालना, विचारांना खाद्य आणि सृजनशक्तीला गती मिळण्याची खात्रीशीर कृती. अजून एक फायदा, जो आपल्या इंग्लिश भाषा शिकण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे; तो म्हणजे आपला शब्दसंग्रह वाढेल, उच्चार दुरुस्त होतील, बोलणे व लिहिणे या कौशल्यांचा विकास होण्यासाठी खात्रीशीरपणे मदत होईल. मागच्या लेखात इंग्लिश भाषेतील पुस्तके वाचनाचे फायदे पाहिले. खरंतर वाचनाचे खूप फायदे आहेत. त्यापैकी आणखी काही महत्त्वाचे फायदे आपण पाहू या.

1) Reading helps Relearning : वाचनाने Learning तर होतेच, पण Relearning होते. फक्त आपण unlearning साठीची तयारी दाखवली पाहिजे. Learning, Unlearning, Relearning म्हणजे नक्की काय ते आधी समजून घेऊ. आपण विविध पद्धतीने, विविध माध्यमांच्या मदतीने शिकत (Learning) असतो. माहिती घेत असतो. पण काही बाबतीत काही काळानंतर आपण घेतलेले ज्ञान अंशतः किंवा पूर्णतः चुकीचे आहे, हे लक्षात येते. मग आपण ते ज्ञान, माहिती वापरणे बंद करतो. (Unlearning) आणि मग आपण त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवून सखोल ज्ञान घेतो. थोडक्यात, आपण स्वतःला दुरुस्त करून पुन्हा शिकतो. या पुन्हा नव्याने शिकण्याला Relearning असे म्हणता येईल. वाचनाने आपले Relearning होण्यास मदत होत असते. 

2) Reading Rejuvenates and Recreates : आपल्याला काही घटनांमुळे, जादा कामामुळे शारीरिक किंवा मानसिक थकवा येण्याची शक्यता असते. काहींना तर नैराश्यही येऊ शकते. अशा वेळी पुस्तके ऊर्जा देतात, नवीन उमेद देतात, काम करण्याची प्रेरणा देतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचनाने आपले मनोरंजन होते. थकवा, नैराश्य जणू गायबच होऊन जाते. 

3) Reading resolves problems : विविध क्षेत्रातील, विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांच्या वाचनाने अनेक अडचणी दूर करून घेता येतात. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, व्याकरण समजून घेण्यासाठी, उच्चार पडताळून पाहण्यासाठी, लिहायला शिकण्यापासून कलात्मक लेखनकला अवगत करण्यासाठीची पुस्तके उपलब्ध आहेत. शब्दकोश, ज्ञानकोश आदींचा वापर अनेक अडचणींवर रामबाण उपाय म्हणून उपयुक्त ठरतो. 

4) Reading leads to Speaking and Writing : नियमितपणे वाचन केल्याने आपल्या बोलण्यात आत्मविश्‍वास निर्माण होतो, बोलणे प्रभावी होते. नवीन नोकरी मिळवताना घेतल्या जाणाऱ्या गटचर्चा, मुलाखती, निर्णयक्षमता यांसारख्या कौशल्यांची जोपासना वाचनातून होते. लेखनकला समृद्ध होते. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र वाचल्याने आपणास ही लेखनाची गोडी निर्माण होऊ शकते. इंग्लिश भाषेतून लिहिताना सर्वांत मोठा अडसर वाटतो तो म्हणजे स्पेलिंगचा. वाचनामुळे यावरही मात करता येते. वरचेवर वाचल्यामुळे एखादे स्पेलिंग चुकीचे आहे, हे एका कटाक्षात समजू शकते.  

5) Reading Reforms : वाचनाने असंस्कृत व्यक्तीही सुसंस्कृत होतात. वाचकांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात. इंग्लिश भाषेचे उदाहरण घेतल्यास असे दिसून येते की, या भाषेतील ज्ञानाचा झरा कधीच न आटणारा आहे. विविध विषयावरील इंग्लिश भाषेतील पुस्तकांच्या वाचनामुळे सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. 

अशा प्रकारे Status Symbol असलेली English ही भाषा आत्मसात करण्याचे महत्त्वाचे आणि हमखास यश मिळवून देणारे साधन म्हणजे वाचन कौशल्य होय. मग काय, नियमित वाचन सुरू करायचं ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com