इंग्रजी शिका : Write to get Right

शैलेश बर्गे
Thursday, 5 March 2020

लेखाच्या शीर्षकावरून लेखनाचे महत्त्व तुम्हाला समजले असेलच. म्हणतात ना, ‘The PEN is mightier than the Sword.’ एखाद्या शस्त्रानेसुद्धा शक्य नाही, ते लेखणीने साध्य करता येते. शब्दाच्या अचूक वापराने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊन जातात. अनेक क्रांतिकारकांनी, विचारवंतांनी, समाज सुधारकांनी हे उपायकारक आणि खात्रीशीर शस्त्र वापरून अनेक अपेक्षित गोष्टी करून घेतल्या.

इंग्लिश भाषेतून प्रभावीपणे संभाषण करण्यासाठी LSRW या कौशल्याचा अभ्यास आपण करत आहोत. कौशल्यक्रमांत शेवटचे, पण सर्वांत काळजीपूर्वक हाताळायचे कौशल्य म्हणजे लेखन. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लेखाच्या शीर्षकावरून लेखनाचे महत्त्व तुम्हाला समजले असेलच. म्हणतात ना, ‘The PEN is mightier than the Sword.’ एखाद्या शस्त्रानेसुद्धा शक्य नाही, ते लेखणीने साध्य करता येते. शब्दाच्या अचूक वापराने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊन जातात. अनेक क्रांतिकारकांनी, विचारवंतांनी, समाज सुधारकांनी हे उपायकारक आणि खात्रीशीर शस्त्र वापरून अनेक अपेक्षित गोष्टी करून घेतल्या. 

शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे लेखनामुळे आपल्याला Right, म्हणजे एक प्रकारचा हक्क मिळतो. याबरोबर लिहीत राहण्याचा आणि बोलण्याचाही हक्क मिळतो. कारण लिहिलेला मजकूर सहजपणे बदलता येत नसल्यामुळे लिहिणारा विचारपूर्वकच लिहितो. आणि समाजाला त्याच्या ज्ञानाचा फायदा होतो. त्यातूनच विचारपूर्वक बोलण्याचीही सवय लागते. लिहिताना योग्य, शुद्ध, अचूक, व्याकरणाच्या नियमांना धरून लिहिले जाते. We start writing Right things. त्याप्रमाणे योग्य प्रकारे बोलण्याचीही सवय लागते. (बऱ्‍याच वेळा आपल्या दैनंदिन जीवनात बोलताना, अनौपचारिकरीत्या बोलताना आपण हे सारे पाळतोच असे नाही.) 
1) बोललेल्या शब्दांची सारवासारव करणे काहीसे सोपे असते, पण लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे एक प्रकारचे कायम स्वरूपाचे रेकॉर्ड तयार होते. 

2) इंग्लिश भाषेच्या बाबतीत आपल्याला बोलण्यापेक्षा लेखनामध्ये जास्त आत्मविश्‍वास असतो. यामुळेच बऱ्याचवेळा आपण काय बोलणार हे आधी लिहूनच काढतो. 

3) मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुढे त्यांच्या भावी आयुष्यात इंग्लिशमध्ये अहवाल लिहिणे, प्रेझेंटेशन तयार करणे हे बोलण्यापेक्षा तुलनेने सोपे वाटते. कारण लिहिताना, टाइप करताना हवा तेवढा वेळ घेता येतो. पण बोलताना आपण क्षणाचा विलंबही करू शकत नाही. या लेखन कौशल्याच्या मदतीने बोलण्याची गती वाढवता येणे शक्य असते. 

नियमितपणे लेखन केल्यास इंग्लिश संभाषणात निश्‍चितच फायदाच होईल. थोडक्यात काय, लेखन कौशल्याच्या सहाय्याने आपल्याला आत्मविश्‍वासाने बोलायचेही आहे, ते कसे, पाहू पुढच्या लेखात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shailesh barge on Write to get Right