esakal | संधी नोकरीच्या - तांत्रिक कौशल्ये आत्मसात करताना
sakal

बोलून बातमी शोधा

Website

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे विविध तांत्रिक विषयातील पहिल्या वर्षांपासून अंतिम वर्षापर्यंतचे ज्ञान तपासण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे GATE परीक्षा. उत्तमरीत्या तयारी करून गांभीर्याने ही परीक्षा दिल्यास, विद्यार्थ्याचा संपूर्ण अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचा एकप्रकारे आढावाच घेतला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटते की, ज्यांना उच्च शिक्षणासाठी M.E/M.Techचा पर्याय निवडायचा असलेल्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षेची तयारी करावी.

संधी नोकरीच्या - तांत्रिक कौशल्ये आत्मसात करताना

sakal_logo
By
शीतलकुमार रवंदळे

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे विविध तांत्रिक विषयातील पहिल्या वर्षांपासून अंतिम वर्षापर्यंतचे ज्ञान तपासण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे GATE परीक्षा. उत्तमरीत्या तयारी करून गांभीर्याने ही परीक्षा दिल्यास, विद्यार्थ्याचा संपूर्ण अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचा एकप्रकारे आढावाच घेतला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटते की, ज्यांना उच्च शिक्षणासाठी M.E/M.Techचा पर्याय निवडायचा असलेल्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षेची तयारी करावी. मात्र, खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी पदवीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या सर्व पर्यायात GATE परीक्षेचा अभ्यास उपयोगी पडतो. नोकरी करायची असते, त्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची चाचणी ही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीमार्फत नक्कीच केली जाते. Core, IT Product किंवा IT Services कंपनी यांत तांत्रिक ज्ञानाची चाचपणी केली जाते. मात्र, Core व IT Product कंपनीत तांत्रिक कौशल्ये उत्तम प्रतिची असल्यावरच निवड केली जाते. यामुळेच GATEची परीक्षा उत्तम तयारी करून देणे नोकरी मिळवण्यासाठी अनिवार्य ठरते. संदर्भ पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर हा चांगले तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतो. 

औद्योगिक क्षेत्रातील छोट्या छोट्या प्रोजेक्टसवर किंवा त्यांच्या आधीच सोडविलेल्या काही प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम केल्यास विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अभियंत्यांची काम करण्याची पद्धत समजते. कुठल्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायांवर कशा पद्धतीने विचार करावा लागतो व उपाय शोधताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची हे विद्यार्थ्यांना शिकता येते.

यासाठी शनिवार/रविवार व इतर दिवशीदेखील महाविद्यालयीन तासिकांनंतर सायंकाळी विद्यार्थ्यांनी जवळच्या एमआयडीसी किंवा इतर औद्योगिक वसाहतीत भेट देऊन एखाद्या कंपनीत काम करावे. दोन सत्रांतील सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांनी कंपनीत जावे.  

नियमितरित्या अशा काही कंपन्यांना भेटी दिल्यानंतर त्यातील काही छोटे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने शोधून समस्यांवरील उपाय कंपन्यांना द्यायला हवेत. सुरुवातीला अशा पद्धतीने त्या कंपनीचा विश्‍वास विद्यार्थी व शिक्षकांनी संपादन केल्यास आणखी काही समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी कंपन्या नंतर स्वतःहून महाविद्यालयाकडे येतात. 

कंपन्यांतील वा इतर आस्थापनांमधील काही समस्या जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईट्स चांगल्या उपयोगी पडतात...