संधी नोकरीच्या : कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय?

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 9 January 2020

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विविध चाचण्यांतून निवड करतात त्यालाच कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात.

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विविध चाचण्यांतून निवड करतात त्यालाच कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यास त्याच्या करिअरची उत्तम सुरुवात होते. अभियांत्रिकीसारख्या कोर्सेसमध्ये वार्षिक ३ ते ३० लाखापर्यंतचे वेतन असलेले जॉबदेखील विद्यार्थ्यांना मिळाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगली नोकरी न मिळाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःच प्रयत्न करून जॉब मिळवताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कमी पगाराची नोकरी व कमी प्रतीचे काम करण्याची तयारी ठेवावी लागते. कॅम्पस प्लेसमेंटमधून मास रिक्रूटमेंट करणाऱ्या कंपन्या TCS, CAPEGEMINI, ACCENTURE, WIPRO, INFOSYS, COGNIZANT सारख्या कंपन्या एकेका वर्षात १०,००० ते ३५,००० विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतात. 

महाविद्यालयाच्या दर्जाप्रमाणे कंपन्या वर्गीकरण करतात
1) TIER-1 उत्तम दर्जा(IIT, NIT, IIIT)
2) TIER-2 मध्यम दर्जा (शासकीय महाविद्यालये व काही उच्च दर्जाची खाजगी महाविद्यालये)
3) TIER-3 साधारण दर्जा (TIER-1 व TIER-2 मध्ये  न मोडणारी चांगली खासगी महाविद्यालये)

(उदाहरणार्थ - कॅपजेमिनी कंपनी साधारण दर्जाच्या विद्यार्थ्याला ३.८ लाख रुपये व उत्तम दर्जाच्या विद्यार्थ्याला ६.८ लाख रुपये पगार देते.)

गेली अनेक दशके या कंपन्या काही ठरावीक महाविद्यालयांच्याच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देत असत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून यातील बऱ्याचशा कंपन्या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना संधी देत आहेत. यापूर्वी कंपन्या सर्व विद्यार्थ्यांना सामान पगार देत असत. मात्र आता विद्यार्थ्यांच्या दर्जाप्रमाणे २-३ वेगवेगळ्या प्रोफाइल व टेक्नॉलॉजीसाठी विविध पगार देतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shitalkumar ravandale on campus placement