परदेशात शिका : शिक्षणाबरोबर नोकरीही..!

Job
Job

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत ते शिक्षण व नंतर नोकरी दरम्यानच्या CPT, OPT आणि STEM बद्दल. आपण एकदा मास्टर डिग्रीसाठी प्रवेश घेतला की, ऑगस्ट ते डिसेंबर आणि जानेवारी ते एप्रिल या दोन सेमिस्टरमध्ये ते होते. 

करीकुलम प्रॅक्टिकल ट्रेनिंग
मेपासून जुलैपर्यंत एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध झाल्यास त्यासाठी लागणारी परवानगी म्हणजे करीकुलम प्रॅक्टिकल ट्रेनिंग (CPT). म्हणजे आपण शिक्षण घेत असल्याच्या विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेणे. हे ट्रेनिंग कधी घेता येते?

मे ते ऑगस्ट व नंतर अजून एक सेमिस्टर म्हणजे डिसेंबरपर्यंतही मिळू शकते. या काळात कुठल्याही प्रकारचा कोर्स करावा लागत नाही. तसेच ऑगस्ट ते डिसेंबर या काळात इंटर्नशिप सुरू ठेवल्यास कॉलेजमध्ये कोर्सेस घेणे अनिवार्य आहे. हे न केल्यास आपले स्टुडंट स्टेट्स धोक्यात येते. यासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मार्गदर्शक सल्लागाराचा योग्य सल्ला घ्यावा. आपल्या कितीही हुशार, स्मार्ट व सिस्टिमला कसे गंडवले अशा सर्व मित्रांचा सल्ला, गूगलवर मिळालेली माहिती यापासून दूर राहा. हे महत्त्वाचे आहे, कारण आपण कधीतरी पकडले जाऊ शकतो. थोडा फायद्यासाठी आपले आयुष्य पणाला लागेल, असे कुठलेही गैरकाम करू नये.

ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग
आपली मास्टर डिग्री पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठीची संधी व त्याच्यासाठी करावे लागणारे पेपरवर्क व परवानगी म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT). आपण मास्टर डिग्री मिळविलेल्या विषयात प्रॅक्टिकल अनुभव मिळवयाची संधी. थोडक्यात, उच्च शिक्षणासाठीची भरलेली फी परत मिळवून, अधिक पैसे मिळतात. यात आपला आर्थिक व व्यावसायिक फायदा आहे. यासाठी आपणास एम्प्लॉयमेंट ऑथ्रोरिझशन डाउनमेंट (EAD) मिळावे लागते. यासाठी आपल्या कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सल्लागार मदत करतो. या प्रकारासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या प्रक्रियेदरम्यान आपण अमेरिकेच्या बाहेर प्रवास करू नये. आपला विद्यार्थी व्हिसा पासपोर्ट वैध असला तरी तो इमिग्रेशन नियमानुसार वैध नाही. आपणाला डिग्री मिळाली की तो व्हिसा संपला. आपले हे EAD कार्ड एक वर्ष वैध असते. आपण हे कार्ड घेऊन कुठेही काम करू शकता. शक्यतो मास्टर्स डिग्री व शिक्षण घेतले त्यात अनुषंगाने काम करावे. त्याचा H१बी व्हिसासाठी फायदा होईल.

स्टेम म्हणजे काय?
STEM ट्रेनिंग वा एक्स्टेंशन हे आपणास अधिक दोन वर्षे EAD मिळवून देते. STEM म्हणजे Sciense, Technolgy, Engieering अँड Mathematics. यामध्ये शिक्षण घेऊन मास्टर डिग्री अमेरिकेत मिळविल्यास आपणास अजून अनुभव मिळवा म्हणून तयार केलेला प्रोग्रॅम आहे. 

STEM चे फायदे -

  • EAD कार्ड अजून दोन वर्षे वाढवता येते.
  • एकंदर तीन वर्षांचा अनुभव मिळवता येतो. 
  • पहिल्या वर्षात H१B व्हिसा न मिळाल्यास पुढील दोन वर्ष ही संधी उपलब्ध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com