परदेशात शिका : व्हिसाचे प्रकार

विलास सावरगावकर, अमेरिका
Thursday, 5 March 2020

आपण आतापर्यंत विविध विषयांत शैक्षणिक संधी कशी घेता येईल, याबद्दल माहिती घेतली. आता आपण विविध प्रकारचे वर्क व्हिसा काय असतात व त्याचे प्रकार या महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रसिद्ध व आवडीचा व्हिसा म्हणजे H1बी. याची अचूक कोटा संख्या आहे पासष्ट हजार. यामधील सात हजार व्हिसा तीन ते चार देशांसाठी राखीव आहेत.

आपण आतापर्यंत विविध विषयांत शैक्षणिक संधी कशी घेता येईल, याबद्दल माहिती घेतली. आता आपण विविध प्रकारचे वर्क व्हिसा काय असतात व त्याचे प्रकार या महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रसिद्ध व आवडीचा व्हिसा म्हणजे H1बी. याची अचूक कोटा संख्या आहे पासष्ट हजार. यामधील सात हजार व्हिसा तीन ते चार देशांसाठी राखीव आहेत. उरले अठ्ठावन्न हजार. हा नंबर कमी/किंवा अधिक करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन विधिमंडळाला आहे. अमेरिकन विदेश विभाग व्हिसांचे रेकॉर्ड ठेवते. या अठ्ठावन्न हजारांमध्ये वीस हजारांचा कोटा येथे मास्टर डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हिसा लॉटरी पद्धतीने देण्यात येतो. एकाला फक्त एकच अर्ज करता येतो. पूर्वी लोक विविध पद्धतीने अर्ज करत होते, त्यामुळे अन्य लोकांना व्हिसा मिळत नव्हता. यावर्षी प्रक्रिया आणखीन सोपी केली आहे. फक्त दहा डॉलर भरून नंबरसाठी अर्ज करायचा. नंबर लागला, तरच पूर्ण फी भरायची. हा अर्ज फक्त रजिस्टर कंपनीच करू शकते. तुम्ही थेट अर्ज करू शकत नाही. हा व्हिसा मिळाल्यास तो तीन वर्षांसाठी वैध असतो. अर्थात, फक्त त्या कंपनीसाठीच वैध असतो. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीत काम करू शकत नाही.

तुम्हाला व्हिसा मिळाल्यास त्याचा कालावधी ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. या व्हिसासाठी भारतात राहूनही अर्ज करू शकतो, फक्त आपल्या कंपनीतर्फे. एकंदर कालावधी हा सहा वर्षांसाठी असतो. आपण ग्रीन कार्डासाठीची पुढील स्टेप घेतल्यास अजून काही वर्षे आपणास मुदत वाढ मिळू शकते, त्याबद्दल अधिक माहिती पुढील लेखात घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article vilas savargavkar on Types of Visas