इम्प्रूव्ह युअरसेल्फ : अर्थ भावंडांच्या नात्यांचा... 

रमेश सूद
Thursday, 3 December 2020

तुम्ही कधी कुटुंबातील भावंडांच्या भांडणाचे कारण शोधले आहे का? तुम्हीही आपल्या भावा-बहिणीशी भांडण्याचा अनुभव घेतला असेल ना? एकमेकांच्या हिताची मनापासून वाटणारी काळजी त्यामागे असते. या काळजीपोटीच आपल्या भाऊ किंवा बहिणीला हानिकारक ठरणारी गोष्ट करण्यापासून थांबविण्याचा सल्ला देण्याची गरज‌ पडते का?

तुम्ही कधी कुटुंबातील भावंडांच्या भांडणाचे कारण शोधले आहे का? तुम्हीही आपल्या भावा-बहिणीशी भांडण्याचा अनुभव घेतला असेल ना? एकमेकांच्या हिताची मनापासून वाटणारी काळजी त्यामागे असते. या काळजीपोटीच आपल्या भाऊ किंवा बहिणीला हानिकारक ठरणारी गोष्ट करण्यापासून थांबविण्याचा सल्ला देण्याची गरज‌ पडते का?

एका तरुण इंजिनियरने सांगितलेला किस्सा मला आठवतो. तिचा मोठा भाऊ एकदा तिला म्हणाला, ‘‘हे बघ मी हे तुला तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. त्यामुळे तू फेरविचार करण्याची गरज आहे. मी तुझा हितचिंतक आहे, बस एवढेच.’’ तिचा मोठा भाऊ काळजीच्या स्वरात बोलत होता. त्यावर त्या तरुण मुलीने त्याला फटकारले. ती म्हणाली, ‘‘ओह, कृपा करून हे नाटक थांबव. मला लेक्चर देऊ नकोस.’’ एवढे बोलून ती पाय आपटत निघून गेली. पर्यायाने नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. असे खूप वेळा घडते. आपण नेहमीच आपल्या जवळच्या व्यक्तींना गृहीत धरतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपले मन अशाप्रकारे काम करते. आपण आपल्याच जवळच्यांना आपल्या मार्गातील अडथळा समजतो. त्यांचा एकमेव दोष म्हणजे त्यांचा आपल्याशी भावनिक बंध तयार झालेला असतो. ते आपल्याला सुरक्षित ठेवू इच्छितात. ही गोष्ट ओळखण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे लागतात. मला अजून आठवते, माझ्या एका सत्रामुळे एका तरुण अधिकाऱ्याच्या बहिणीबरोबरच्या नात्यातील तणाव निवळला. दोघेही बहीण-भाऊ नऊ वर्षे एकमेकांना बोलत नव्हते.

मात्र, या भावाने बहिणीसाठी आपल्या पहिल्या पगारातून भेटवस्तू दिली. ती तिने स्वीकारली. या अधिकाऱ्याने ही हृदयस्पर्शी गोष्ट सांगून माझे धन्यवाद मानल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती खरच सुंदर गोष्ट होती. खरे तर आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती बरोबरच्या नात्यातील तणाव दूर करून आयुष्याचा पुन्हा आनंद घ्यायला कधीच उशीर होत नसतो. तुम्हाला काय वाटते?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: