
जपानमध्ये अगदी लहानपणापासून मुले ओरिगामी ही कला शिकतात. ओरिगामी केवळ कला नसून, त्यामधून भूमितीचा अभ्यासही केला जातो. ओरिगामी मूळची जपानी कला आहे. ओरिगामी शब्द हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. ‘ओरी’ म्हणजे दुमडणे आणि जपानी भाषेमध्ये ‘कामी’ म्हणजे पेपर, जो ‘ओरी’बरोबर जोडून आल्यामुळे त्याचा ‘गामी’ असा अपभ्रंश झाला आहे. म्हणजे, पेपर दुमडण्याची ही एक कला आहे.
जपानमध्ये अगदी लहानपणापासून मुले ओरिगामी ही कला शिकतात. ओरिगामी केवळ कला नसून, त्यामधून भूमितीचा अभ्यासही केला जातो. ओरिगामी मूळची जपानी कला आहे. ओरिगामी शब्द हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. ‘ओरी’ म्हणजे दुमडणे आणि जपानी भाषेमध्ये ‘कामी’ म्हणजे पेपर, जो ‘ओरी’बरोबर जोडून आल्यामुळे त्याचा ‘गामी’ असा अपभ्रंश झाला आहे. म्हणजे, पेपर दुमडण्याची ही एक कला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या ‘ओरिगामी’चा उपयोग कारमधील एअर बॅग्ज किंवा हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंट्सच्या डिझाइनमध्ये केला गेला आहे. गणितामध्ये मोठ्या प्रमाणात ओरिगामी वापरले जाते आणि अवघड गोष्टी सोप्या करून शिकवल्या जातात. ओरिगामीवर एका रॉबर्ट लाँग या गणितज्ञाने ‘TED’ वर भाषण दिले आहे - त्याचे नाव ‘The math and magic of origami’ असे आहे.
जपानमध्ये असे म्हटले जाते की, एक हजार ‘ओरिगामी’चे पक्षी (क्रेन्स) केले आणि इच्छा व्यक्त केली, तर ती पूर्ण होते. त्यावर Sadako and the Thousand Paper Cranes नावाचा सत्यघटनेवर आधारित प्रसिद्ध सिनेमाही आहे.
ओरिगामीसाठी विशेष प्रकारचा चौकोनी पेपर वापरला जातो. हा पेपर आपल्याकडेही उपलब्ध असतो. भूमितीमध्ये, अभियांत्रिकी, कंपन्यांच्या स्टोअरेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साहित्य कसे ठेवले जाईल, याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. तसेच इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये याचा उपयोग केला जातो. जपानमध्ये थ्री डी ओरिगामीसुद्धा प्रसिद्ध आहे.
जपानमध्ये भूमिती शिकवण्यासाठी ओरिगामीचा विशेष उपयोग केला जातो. कात्रीचा उपयोग न करता फक्त पेपरच्या वेगवेगळ्या प्रकारे घड्या घालून वेगवेगळे पक्षी, प्राणी, घरे, फुले असे बरेच आकार केले जातात. जपानी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओरिगामीचा अभ्यास नक्की करावा. ओरिगामी शिकवणारे वेगळे शिक्षक असतातच, पण ही कला अनेक माध्यमांतून शिकता येते. उदा. यू-ट्यूब, या विषयावरील वेगवेगळी सचित्र पुस्तके, ओरिगामी कलेचा प्रसार करणारे गट इत्यादी.
पुण्यामध्येही ओरिगामीचे प्रदर्शन भरते, त्यामध्ये अनेक प्रकारची ओरिगामी प्रात्यक्षिके पाहायला मिळते. तुम्ही या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला हवी. ओरिगामीमधून शिकण्यासारखे खूप काही आहेच, पण त्याचबरोबर ओरिगामी करत असताना खूप एकाग्रता लागते. त्याचा मेंदूची शक्ती वाढण्यासाठी मोठा उपयोग होतो. ओरिगामीच्या छंद असलेले लोकही जपानी भाषा शिकतात आणि त्यामधून त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. घराच्या घरी ओरिगामी शिकण्याची संधी असल्यामुळे मुलांना आणि महिलांचा सकारात्मक विरंगुळा मिळू शकतो.
जपानी संस्कृतीचा अभ्यास करताना ओरिगामीचा अभ्यास नक्की करायला हवा.
Edited By - Prashant Patil