‘एआय’च्या व्यवहार्यतेचा अभ्यास!

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 15 October 2020

सर्वप्रथम आपला प्रश्न ‘एआय’च्या साहाय्याने सोडविता येईल का, ते तपासून घ्यावे. प्रश्न सोडविण्यासाठीचे तालीम संच उपलब्ध होऊ शकतात का, हा यातील कळीचा मुद्दा आहे. आपण परत परत वाचले आहे - ‘विनातालीम संच नाही ‘एआय’!’

आपण आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये ‘एआय’ची ओळख करून घेतली, त्यातील बारकावे समजून घेतले आणि त्याचे प्रत्यक्षातील उपयोग बघितले. मागच्या लेखामध्ये आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘एआय’चा कसा वापर करावा, याविषयी विवेचन केले. या लेखामध्ये त्याविषयी अजून काही मुद्द्यांचा विचार करूया.

सर्वप्रथम आपला प्रश्न ‘एआय’च्या साहाय्याने सोडविता येईल का, ते तपासून घ्यावे. प्रश्न सोडविण्यासाठीचे तालीम संच उपलब्ध होऊ शकतात का, हा यातील कळीचा मुद्दा आहे. आपण परत परत वाचले आहे - ‘विनातालीम संच नाही ‘एआय’!’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खूप वेळा अशा प्रसंगी प्रश्न विचारला जातो - ‘एआय’ प्रणालीची अचूकता किती असेल? सर्वसाधारणतः या कामातील कुशल मनुष्यबळाएवढी अचूकता प्राप्त करता  येणे शक्य आहे; पण त्यासाठी या मनुष्यबळाला उपलब्ध असलेली माहिती किंवा ज्ञान ‘एआय’ प्रणालीला तालीम संच किंवा गुणवैशिष्ट्यांच्या स्वरूपात पुरवावे लागेल.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालीम संच उपलब्ध असतील, तर प्रत्येक उदाहरणाबरोबर उपलब्ध असलेली किंवा त्यापासून ताडता येणारी गुणवैशिष्ट्ये ही प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त आहे का, हे आपल्याला कार्यक्षेत्र तज्ज्ञांकरवी तपासून घ्यावे लागेल. अशी गुणवैशिष्ट्ये उपलब्ध नसल्यास ती कशी मिळवायची याचा विचार करावा लागेल. कदाचित त्यासाठी काही तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल किंवा संगणक प्रणाली तयार करावी लागेल. अनेक वेळा तालीम संचामधील उदाहरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असतात - त्या माहिती संकलनामुळे आलेल्या असतात किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे, जसे की संगणक प्रणालीची अनुपलब्धता! या त्रुटीयूक्त उदाहरणांसोबत काम करताना या त्रुटी ‘एआय’ प्रणाली तयार करताना डोईजड तर होणार नाहीत ना, याचा अंदाज घ्यावा लागतो.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वरील गोष्टींचा विचार करता ‘एआय’ प्रणाली व्यवसायिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का ते पडताळून पाहावे - व्यावसायिक आणि कुशल ‘एआय’ प्रणाली तयार करण्यातील  व्यवहार्यता या दोन कसोट्या सर्वत्र वापरल्या जातात.  

या सर्व मुद्द्यांचा ‘एआय’ प्रणाली विकसित करणे किती व्यवहार्य आहे, या अभ्यासात समावेश असतो. यालाच ‘एआय फिजिबिलिटी स्टडी’ असे म्हणतात. एकदा अशी प्रणाली विकसित करायची खूणगाठ बांधल्यावर आपल्याला माहितीचे पृथक्करण करावे लागते, यातून आपल्याला अपेक्षित उत्तराचे अचूक अंदाज बांधण्यासाठी लागणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचे आकलन होते. अनेकदा या पायरीला फारसे महत्त्व दिले जात नाही; पण माझ्या दृष्टीने या पायरीचे एकंदरीत प्रक्रियेमधील महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

पुढील भागात इतर पायऱ्यांविषयी सविस्तरपणे बोलूया.  

पुणे

शिक्षण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish tendulkar writes article about Artificial intelligence

Tags
टॉपिकस
Topic Tags: