esakal | 10 वी, 12 वीसह ITI विद्यार्थ्यांना आसाम रायफल्समध्ये संधी; 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Assam Rifles

आर्मीत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी!

10 वी, 12 वीसह ITI विद्यार्थ्यांना आसाम रायफल्समध्ये संधी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

आर्मीत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी! आसाम रायफल्सने ग्रुप बी व सी पदांसाठी टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या भरतीकरिता अधिकृत अधिसूचना नुकतीच जारी केलीय. यासाठी 10 वी, ITI, 12 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. दरम्यान, अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला assamrifles.gov.in देखील भेट देऊ शकतात.

महत्वाच्या तारखा..

  • अर्ज करण्याची तारीख - 11 सप्टेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021

  • फी भरण्याची तारीख - 25 ऑक्टोबर 2021

  • परीक्षेची तारीख - 1 डिसेंबर 2021

हेही वाचा: वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

पात्रता : या पदांसाठी मान्यताप्राप्त संस्था, इंटरमीडिएट अथवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10+2) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून आवश्यक आहे. शिवाय, संबंधित ट्रेडसाठी आयटीआयसह 10 वी उत्तीर्ण असणंही गरजेचं आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असणं आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

ग्रुप बी पोस्टसाठी - 200 रुपये

ग्रुप सी पोस्टसाठी - 100 रुपये

उमेदवार ऑनलाइन पद्धतीने देखील परीक्षा शुल्क फी भरू शकतात.

निवड कशी होईल?

उमेदवारांची निवड PST, PET आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.

loading image
go to top