Assistant Professor: नेटसेट शिवायही सहायक प्राध्यापक होणं शक्य? यूजीसीने तयार केली नवीन नियमावली
Assistant Professor Without NET-SET Eligibility: सहायक प्राध्यापक होणं शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरूपदाची पात्रता, निवडीसाठी नवीन नियमावली तयार केली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी नवी दिल्लीत नेटसेटची नवीन नियमावली जाहीर केला. यामध्ये किमान ५५ टक्क्यांसह पदवीत्तर पदवी मिळालेले उमेदवारही आता सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकतील.