Balbharti Books : तुमचं बालपण समृद्ध करणारी बालभारतीची पुस्तकं परत कशी मिळवाल ?

संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत.
Balbharti Books
Balbharti Books sakal

मुंबई : शूरवीर शिवाजी महाराज असोत वा विसरभोळा गोकुळ नाहीतर अक्कू बक्कू... बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांतील सर्वच पात्रांनी आपलं बालपण समृद्ध केलं आहे. याच बालभारतीचा आज स्थापना दिवस.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन झालेली संस्था असून बालभारती या नावाने ती ओळखली जाते. (Balbharti) हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे ,या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. (how to find balbharti old textbooks )

संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. बालभारतीची पाठ्यपुस्तके तळागाळात पोहोचत असल्यामुळे या पुस्तकांनी राज्य मंडळाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवल्या आहेत.

बालभारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पुस्तके काळानुरूप बदलत गेली. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला साजेशी रंगसंगती, चित्रे, मजकूर, अभ्यासक्रम यामुळे ही पुस्तके आजही लोकप्रिय आहेत.

कमीत कमी पानांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास साहित्य समावून घेणाऱ्या या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होते. तसेच कमीत कमी किंमतीत उपलब्ध असल्यामुळे आणि आठवीपर्यंत मोफत मिळत असल्यामुळे ही पुस्तके तळागाळापर्यंत पोहोचतात.

बालभारतीच्या सहवासात आपलं शैक्षणिक बालपण घालवलेले कित्येक महाराष्ट्रीय नागरिक आज सातासमुद्रापार गेले आहेत आणि तेथेही त्यांनी बालभारतीची आठवण मनात जपून ठेवली आहे.

मुलं, नातवंडं केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळेत शिकत असली तरी बालभारतीची पुस्तके पाहाणे आणि त्यातल्या कथा, कविता वाचणे हे मोठ्या माणसांसाठी स्मरणरंजन ठरते.

त्यामुळेच की काय पण बालभारतीचं अमुक एका सालातलं अमुक विषयाचं पुस्तक कुठे मिळेल, कोणाकडे आहे असे प्रश्न अनेकदा समाजमाध्यमांवर आणि खासगी चर्चांमध्येही एकमेकांना विचारले जातात.

बालभारतीलाही आपल्या लोकप्रियतेची कल्पना आहे. त्यामुळे संस्थेने ही पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून स्मरणरंजनाची सोय केली आहे.

https://books.balbharati.in/ या संकेतस्थळावर २००७ सालापासूनची विविध माध्यमांची विविध विषयांची पुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com