
पुणे - बारावीच्या परीक्षेचा निकाल लागून जवळपास ८५ हून अधिक दिवस उलटून गेले तरीही आतपर्यंत बीबीए, बीबीएम अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. परिणामी या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अखेर उशिरा का होईना जागे होत, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑगस्ट महिन्याचे आठ दिवस उलटून गेल्यानंतर सुरू केली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना १३ ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.