माणसांच्या जगण्याची प्रेरणा ही त्याच्या गरजा पूर्ण करणे असते, असे अमेरिकन शास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी प्रतिपादित केले आहे. माणसांच्या गरजांची एक चढती मांडणी - पिरॅमिड असते. सुरुवातीच्या गरजा या शारीरिक गरजा असतात. भूक भागविण्यासाठी अन्न, ऊन - वारा - थंडी यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी वस्त्रे आणि निवारा यासाठी मनुष्य सर्वाधिक आणि सर्वप्रथम प्रयत्न करतो.