
रीना भुतडा - करिअर समुपदेशक
‘पीसीबी’ गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’शिवायही करिअरच्या अनेक वाटा असतात. ४ मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या पर्यायांविषयी विचारणा केली होती. महाराष्ट्रात ‘नीट’ देणाऱ्या तीन लाख विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी फक्त ‘एमबीबीएस’ याच कोर्सचा विचार करतात, मात्र अनेकदा दोन-तीन प्रयत्नांनंतरही ‘एमबीबीएस’ला प्रवेश न मिळाल्यास निराश होण्यापेक्षा ‘प्लॅन बी’ काय असेल? याचा विचार करून त्या अभ्यासक्रमांची माहिती आपण घेऊया.