Jobs : BHEL मध्ये इंजिनिअर अन्‌ सुपरवायझर पदांची भरती! 70 हजारहून जास्त पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHEL
BHEL मध्ये इंजिनिअर अन्‌ सुपरवायझर पदांची भरती! 70 हजारहून जास्त पगार

BHEL मध्ये इंजिनिअर, सुपरवायझर पदांची भरती! 70 हजारहून जास्त पगार

भारत हेवी इलेक्‍ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited - BHEL) ने अभियंता (Engineers) आणि पर्यवेक्षक (Supervisor) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट pswr.bhel.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेला 28 डिसेंबर 2021 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे. अर्जाची प्रिंट-आउट पाठवण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे. (Bharat Heavy Electricals Limited is recruiting Engineer and Supervisor posts)

हेही वाचा: रेड झोनमध्ये 13 जिल्हे! शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता

या भरती (Recruitment) अंतर्गत अभियंत्याची 10 पदे व पर्यवेक्षकाची 26 पदे भरावयाची आहेत. अभियंता पदासाठी 71,040 दरमहा तर पर्यवेक्षक पर्यवेक्षक पदासाठी दरमहा 39,670 रुपये वेतन मिळेल.

जाणून घ्या क्षमता

अभियंता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमधील (Civil Engineering) अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील 4 वर्षांची पदवी किंवा दुहेरी पदवीसह स्थापत्य अभियांत्रिकीमधील अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील 5 वर्षांची एकात्मिक पदव्युत्तर पदवी. सामान्य, OBC, EWS उमेदवारांना किमान 60 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. ज्यामध्ये SC / ST उमेदवारांना 50 टक्के गुण असावेत. उमेदवाराला पात्रतेसह किमान 8 वर्षांचा अनुभव असावा.

पर्यवेक्षक : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा (Diploma) केलेला असावा. सामान्य, OBC, EWS उमेदवारांना किमान 60 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. ज्यामध्ये SC / ST उमेदवारांना 50 टक्के गुण असावेत. पात्रतेसह उमेदवाराला किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. 1 जानेवारी 2022 रोजी उमेदवारांचे वय 40 वर्षे असावे. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

हेही वाचा: अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात बंपर भरती! पगार दरमहा अडीच लाख

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी pswr.bhel.com, careers.bhel.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्जाची फी 200 रुपये असेल. तर SC / ST / PWB उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

Web Title: Bharat Heavy Electricals Limited Is Recruiting Engineer And Supervisor Posts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top