esakal | BEL Recruitment : देशभरातील 'या' राज्यांत 'बीईएल'कडून 268 जागांसाठी मोठी भरती

बोलून बातमी शोधा

BEL Company
BEL Recruitment : देशभरातील 'या' राज्यांत 'बीईएल'कडून 268 जागांसाठी मोठी भरती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : BEL Recruitment 2021 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या 'नवरत्न कंपनीने (बीईएल) देशभरातील 8 वेगवेगळ्या प्रदेशातील एकूण 268 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. बीईएल कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, आसाम, गुजरात आणि जम्मू-काश्मीर प्रदेशातील प्रकल्प अभियंता पदासाठी अर्ज मागवत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी बीईएलच्या अधिकृत वेबसाइटवर (bel-india.in) आपला ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार 21 एप्रिलपासून सुरू झाली असून 5 मेपर्यंत उमेदवार आपला ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

कोण अर्ज करू शकेल?

बीईएल प्रकल्प अभियंता भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स अथवा संबंधित व्यापारात बीई-बीटेक पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच 1 एप्रिल 2021 पर्यंत उमेदवारांना किमान 2 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त 1 एप्रिल 2021 पर्यंत उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी व इतर राखीव वर्गातील उमेदवारांना जास्तीत-जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे.

बायोकेमिस्टमध्ये करा करिअर अन् मिळवा जबरदस्त पगार

प्रदेशानुसार रिक्त पदांची संख्या

  • दिल्ली - 12 पदे

  • उत्तर प्रदेश - 48 पदे

  • मध्य प्रदेश - 12 पदे

  • राजस्थान - 24 पदे

  • पंजाब - 64 पदे

  • आसाम - 24 पदे

  • गुजरात - 36 पदे

  • जम्मू आणि काश्मीर - 48 पदे