बिट्सॅट ही भारतातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बिट्स) पिलानीमार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि हीच त्यांच्या पिलानी, गोवा आणि हैदराबाद येथील कॅम्पसमध्ये प्रवेशासाठीचा मार्ग आहे. शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा, स्टार्टअप कल्चर आणि नावीन्यपूर्ण संस्कृती यासाठी बिट्स प्रसिद्ध आहे आणि अनेकदा ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये त्यांची आयआयटींशी तुलना केली जाते.