NEET Preparation Tips & tricks: करिअर घडविताना - NEET तयारी करताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Preparation Tips & tricks

NEET Preparation Tips: करिअर घडविताना - NEET तयारी करताना...

के. रवींद्र

NEET परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि भारतातील वैद्यकीय महाविद्यालये/विद्यापीठांद्वारे प्रदान केलेल्या इतर नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही राष्ट्रीय-स्तरीय प्रवेश परीक्षा आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ७ मे रोजी परीक्षा आयोजित करेल. भारतातील विविध सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि आयुष कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ते NEET स्कोअरद्वारे अर्ज करू शकतात. एआयआयएमएस, जेआयपीएमईआर, एएफएमसी आदी वैद्यकीय संस्थांमध्येही प्रवेश दिले जातात.

किमान पात्रता

उमेदवारांकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजी मुख्य विषय म्हणून मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी किंवा समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक.

बारावीमधील NEET पात्रता गुण हे ‘पीसीबी’ विषयांसाठी एकूण गुण आहेत.

NEET परीक्षेसाठी बारावीची आवश्यक टक्केवारी ः खुला गट ः ५० टक्के, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती/जमाती ः ४० टक्के, पीडब्लूडी ः ४५ टक्के

NEET परीक्षेसाठी प्रयत्नांची मर्यादा नाही.

परदेशी नागरिक ः परदेशात शिक्षण घेतले आहे आणि भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची योजना आखत आहेत; त्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजी विषयांसह ‘एआययू’द्वारे ‘एमसीआय’ नियमांनुसार ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेले असावे.

बारावीच्या परीक्षेत बसले विद्यार्थी NEETसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

उमेदवाराने प्रवेशादरम्यान किंवा प्रवेशाच्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपूर्वी वयाची १७ वर्षे पूर्ण केलेली असावीत. NEET साठी अर्ज करण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

परीक्षा पद्धत

परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल (पेन आणि पेपर-आधारित).

प्रश्नांची संख्या ः २०० प्रश्न असतील त्यापैकी १८० प्रश्न अनिवार्य. विभाग ‘ब’मध्ये पर्याय दिले जातील.

प्रश्नांचा प्रकार ः प्रश्नामध्ये एकाधिक निवड प्रश्न (MCQ) असतील.

कालावधी ः परीक्षेचा कालावधी ३ तास आणि २० मिनिटे असेल. (कोरोना काळामध्ये २० मिनिटे वाढवून दिली होती, २०२३ परीक्षेचा कालावधी लवकरच सूचना जारी होतील.)

माध्यम ः NEET प्रश्नपत्रिका २०२३ या भाषांमध्ये असेल ः इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, मराठी, उडिया, तमीळ, तेलगू, उर्दू, पंजाबी.

गुणांकन पद्धत ः प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा.

प्रवेश प्रक्रिया : २ पद्धतीने

NEET परीक्षेसाठी पात्र ठरलेले इच्छुक १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी, डिम्ड विद्यापीठांमधील १०० टक्के जागांसाठी तसेच केंद्रीय विद्यापीठे, ‘ईएसआयसी’ आणि ‘एएफएमसी’मध्ये देखील अर्ज करू शकतात.

८५ टक्के राज्य कोट्यातील जागा ः ८५ टक्के राज्य कोट्यातील जागा म्हणजे अनुक्रमे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व सरकारी महाविद्यालयांमधील जागा.

अशा जागांसाठी समुपदेशन संबंधित राज्य प्राधिकरणांकडून केले जाईल.

राज्य कोट्यातील जागांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश प्राधिकर णाने घालून दिलेले NEET पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे आणि त्यात रहिवासी, आदी अटी समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात ‘सीइटी’सेल कडून ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

आवश्यक कागदपत्रे

बारावी किंवा समतुल्य परीक्षेची गुणपत्रिका

दहावी किंवा समतुल्य उत्तीर्ण प्रमाणपत्र

आधार कार्ड

वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (परिशिष्ट-H)

लागू पडत असल्यास :

जातीचे प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र

नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र ३१/०३/२०२४ पर्यंत वैध (DT-A, NT-B, NT-C, NT-D आणि SBC सह OBC साठी)

महाराष्ट्रातील एकूण

वैद्यकीय महाविद्यालये

२९ शासकीय २१ खासगी महाविद्यालये तर १२ डिम्ड युनिव्हर्सिटी आहेत तसेच १ एम्स नागपूर.

‘बीडीएस’चे शासकीय ४ तर २५ खासगी महाविद्यालये तर ८ डिम्ड युनिव्हर्सिटी आहेत.