
- सीए प्रणव राजा मंत्री
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आजची पिढी वाचनाच्या सवयीपासून दूर होत चालली आहे. मी असे म्हणत नाही की हे प्लॅटफॉर्म महत्त्वाचे नाहीत परंतु प्रत्येक गोष्टीसाठी इष्टतम वेळ दिला पाहिजे. आपल्यापैकी किती जण नियमित वाचन करतात? शाळा, महाविद्यालयातील मुलं तर वाचनाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वाचन ही एक सुंदर कला आहे आणि प्रत्येकाने ती जोपासावी.
चला तर मग जाणून घेऊयात वाचनाचे काही निवडक फायदे :
ज्ञानात भर
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो आणि ते योग्यरीत्या वापरतो. वाचन हे प्रत्येक गोष्टीबद्दल काहीही शिकण्याचा प्रवेशद्वार आहे. जितके जास्त वाचाल तितके जास्त ज्ञान मिळेल.
कल्पनाशक्ती वाढवते
वाचन कल्पनाशक्ती वाढवते. व्यक्तीमध्ये धैर्याचा संचार करते. वाचनामुळे जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. वाचन करणारा व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता बाळगतो. आपण दूरदर्शन किंवा चित्रपट पाहतो, तेव्हा आपल्याला स्क्रीनवर सर्व माहिती दिली जाते. आपल्याला कल्पना करण्याची आवश्यकता भासत नाही. आणि दुसरीकडे पुस्तक हे म्हणजे फक्त पानांवर लिहिलेले शब्द, आपल्याला त्या शब्दांची व्याख्या समजून घ्यावी लागते. हे आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
शब्दसंग्रह आणि संवाद सुधारतो
शब्दसंग्रह सुधारण्याचा आणि शब्दलेखन कौशल्य वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. ज्याचा उपयोग आपण निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो. दररोज एक तास वाचन केल्याने तुमच्यासमोर वर्षभरात चार लाख शब्द समोर येतात.
एकाग्रता सुधारते
वाचनामुळे तुमचे लक्ष केवळ हातात असलेल्या कामावर केंद्रित होत नाही, तर ते तुम्हाला माहितीमध्ये बुडवून टाकते, तुम्ही जे वाचता त्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. वाचन तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्यास भाग पाडते, ज्याने की तुमची एकाग्रता वाढते. जर तुम्ही तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मार्ग शोधत असाल तर वाचन तुम्हाला मदत करेल.
व्यक्तिमत्त्व खुलते
वाढलेल्या शब्दसंग्रहाने, तुम्ही अधिक चांगले संवादक व्हाल. आपल्याला वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो. आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.
तुम्हाला वाचन सुरू करण्यात अडचण येत असेल, तर दररोज आपल्या वेळापत्रकात वाचन करण्यासाठी थोडा वेळ शोधा. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी फक्त दहा मिनिटे जरी वाचनास दिली तरीही, तुम्हाला त्याचे बरेच फायदे दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.