esakal | 'सीएस'चा निकाल बुधवारी होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

CA Exam

'सीएस'चा निकाल बुधवारी होणार जाहीर

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता घोषित करण्यात येणार आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या http://www.icsi.edu/ या संकेतस्थळावर हा निकाल पाहायला मिळेल, अशी माहिती संस्थेच्या संचालक प्रीती बॅनर्जी यांनी दिली आहे.

जुलै महिन्याचा १० आणि ११ तारखेला यासंबंधीची प्रवेश परीक्षा पार पडली होती. परिक्षार्थीला त्यांच्या ई- निकालाबरोबरच प्रत्येक विषयातील गुण सुद्धा समजणार होते. निकाल घोषित झाल्यानंतर परीक्षार्थींना त्यांचे निकालपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

loading image