

The Power of a Calm Mind
sakal
डी. एस. कुलकर्णी (जीवनकौशल्य प्रशिक्षक)
जरा हटके
अगदी अलीकडचा असा एक प्रसंग आठवला. एका छोट्या सहलीला निघालो होतो. गाडीत गप्पा, गाणी, हशा, अगदी हलकंफुलकं वातावरण. गावाच्या बाहेर गेल्यानंतर चढाचा रस्ता लागला. त्यावरून जात असताना अचानक मला ब्रेक दाबावा लागला. कारण डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कडून एक छोटंसं, चिमणीएव्हढे भुऱ्या रंगाचे पाखरू जिवाच्या आकांताने पळत होतं. त्यामागे हिरव्या रंगाचा साप लागला होता. पाखराला उडता येत होतं, पंख होते, ताकद होती, परंतु भीतीने ते स्वतःच्याच पंखांचे अस्तित्व साफ विसरून गेलं होतं.