

Career Guidance: Understanding the Art of Action and Reaction
esakal
विनायक द्रविड ; करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
अनेक वेळा क्रियेला प्रतिक्रिया द्यावी लागते, परंतु प्रत्येक वेळी असे करणे योग्य ठरेलच असे नाही. समोरच्याने एखादी गोष्ट, एखादी कृती केली की, आपण लगेच त्याला उत्तर देणे हे अनेकदा चुकीचे ठरू शकते. विशेषतः कुटुंबात, समाजात, मैत्रीमध्ये, ऑफिसमध्ये असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रतिक्रिया न देता शांत बसणे हे फायद्याचे ठरते. कोणत्या कृतीला कधी आणि कसा प्रतिसाद द्यायचा हा निर्णय फार विचारपूर्वक घ्यावा लागतो. इथे तुमच्या परिपक्वतेची परीक्षा होते काही वेळेला प्रतिक्रिया ही ताबडतोब देणे योग्य ठरते, तर समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचतात. आपण न केल्यास लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात व तिथेच तुमचा स्वाभिमान संपतो. फक्त ही क्रिया योग्य पद्धतीने वापरायची असते, या उलट काही वेळा परिस्थिती अशी असते, की प्रतिसाद काही काळाने देणे उपयुक्त ठरते. हे सर्व निर्णय समोरचा व्यक्ती आणि परिस्थिती हे बघून घ्यावे लागतात.