करिअर वेध : प्रामाणिकपणा, नैतिकता व जीवनमूल्ये

करिअर घडवताना प्रामाणिकपणा, नैतिकता आणि जीवनमूल्यांचे भक्कम संस्कार का आवश्यक, कॉर्पोरेट जगतातील उदाहरणांसह मार्गदर्शन
The Golden Rule of Integrity: Aligning Words with Actions

The Golden Rule of Integrity: Aligning Words with Actions

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

प्रामाणिकपणा हा गुण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि आवश्यक आहे. प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि अर्थातच बाहेरच्या जगाशी, समाजाशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. माणसाच्या आयुष्यात प्रामाणिकपणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असते. एक व्यक्ती म्हणून आयुष्यभर प्रामाणिकपणाचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.

कॉर्पोरेट जगतात काम करताना एका विद्वानाने प्रामाणिकपणाची सोपी व्याख्या सांगितली होती, ‘जे सांगता तेच करा आणि जे करता तेच सांगा.’ जगाने तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा प्रामाणिकपणा उच्चस्तरीय पाहिजे. कदाचित आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठे नाव कमवायचे असल्यास प्रामाणिकपणाशिवाय पर्याय नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com