

Helping Students Make Informed Career Choices
sakal
रीना भुतडा (करिअर समुपदेशक)
नवी क्षितिजे
गेल्या एका वर्षात ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर मार्गदर्शनावर आधारित ‘नवी क्षितिजे’ या लेखमालेत लेख सादर करण्याची संधी मला मिळाली. हा प्रवास केवळ लेखनाचा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्प्यावर योग्य दिशा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. अभ्यास, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, करिअरचे निर्णय, होणाऱ्या सामान्य चुका आणि भविष्यातील संधी याबाबत स्पष्टता निर्माण करणे, हा या लेखमालिकेचा मुख्य उद्देश राहिला.