‘लॉ’मधील करिअर

कोर्ट-कचेरी म्हटले की, अनेकांना भीती वाटते. परंतु, याच क्षेत्रात करिअर करायचे असेही अनेकांचे स्वप्न असते. लॉ किंवा कायदेविषयक शिक्षणानंतर हे शक्य होते.
Law
Lawsakal

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

कोर्ट-कचेरी म्हटले की, अनेकांना भीती वाटते. परंतु, याच क्षेत्रात करिअर करायचे असेही अनेकांचे स्वप्न असते. लॉ किंवा कायदेविषयक शिक्षणानंतर हे शक्य होते.

पदवीचे मार्ग

बारावीनंतर पाच वर्षांचा बीए एलएलबी, बीकॉम एलएलबी, बीएससी एलएलबी, बीबीए एलएलबी, बीएलएस एलएलबी यांपैकी कोणताही एक इंटिग्रेटेड कोर्स करता येतो. जर पदवी शिक्षण पूर्ण झाले असेल, तर तीन वर्षांचा एलएलबी कोर्स करावा लागतो.

प्रवेशपरीक्षा

CLAT , LSAT , AILET , MH CET LAW या परीक्षा कायदेविषयक शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा आहेत. पाच वर्षांच्या इंटीग्रेटेड कोर्ससाठी बारावी हे शिक्षण अपेक्षित आहे. तीन वर्षांच्या एलएलबी या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी कोणत्याही शाखेतील पदवी हे शिक्षण अपेक्षित आहे.

स्पेशलायझेशन व विषय

बिजनेस लॉ, कॉर्पोरेट लॉ, क्रिमिनल लॉ, सायबर लॉ, इंटरनॅशनल ट्रेड लॉ , इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ, लेबर लॉ हे विविध स्पेशलायझेशन्स आहेत. पॉलिटिकल सायन्स, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, लीगल मेथड, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल लॉ, लॉ ऑफ इव्हिडन्स, प्रॉपर्टी लॉ, लीगल रायटिंग, प्रोफेशनल एथिक्स, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, बिझनेस लॉ, फॅमिली लॉ, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लीगल इंग्लिश, लॉ ऑफ क्राइम्स, कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ आदी विषय पदवी शिक्षणात शिकविले जातात. थिअरी, प्रात्यक्षिके, इंटर्नशिप या माध्यमातून अभ्यासक्रम राबविला जातो. लॉ ग्रॅज्युएटला लॉ फर्म किंवा वरिष्ठ अधिवक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर्नशिप आवश्यक आहे.

पदे

ॲटर्नी जनरल, न्यायाधीश, सॉलिसिटर, लीगल मॅनेजर, वकील/ॲडव्होकेट, सिव्हिल लॉयर, क्रिमिनल लॉयर, कॉर्पोरेट लॉयर, लीगल ॲडव्हायजर, लॉ ऑफिसर, लीगल जर्नालिस्ट, लीगल ॲनालिस्ट, नोटरी, प्राध्यापक, लीगल रिसर्चर, लीगल रायटर, कॉर्पोरेट काऊंसेलर, कंपनी सेक्रेटरी आदी पदांवर किंवा जबाबदाऱ्यांसाठी ही पदवी पात्र असते.

कायदा कार्यक्षेत्रातील संधी

न्यायाधीश - कायदेविषयक पदवी शिक्षण पूर्ण असेल आणि वयोमर्यादा २१ ते ३५ मध्ये महाराष्ट्र सिव्हिल जज (ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झाम ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास न्यायाधीश या पदावर नेमणूक होऊ शकते.

वकील - कोर्टात वकिलीसाठी पात्र होण्यासाठी प्रथम अखिल भारतीय बार कौन्सिलद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ऑल इंडिया बार कौन्सिलमध्ये नावनोंदणी केल्यानंतर, ही मंडळी देशभरातील कोणत्याही न्यायालयात प्रॅक्टिस करण्याचा पर्याय निवडू शकतात.

अन्य संधी - एलएलबीनंतर उत्तम करिअरसाठी विद्यार्थी सरकारी सेवेत रूजू होण्याचा पर्याय निवडू शकतात. ते भारतीय विधी सेवा आणि संबंधित विविध पदांसाठी पात्र ठरतात. यामध्ये विधी सल्लागार आणि कायदेशीर व्यवहार विभागातील कायदेशीर सल्लागारांचा समावेश आहे. एलएलबी झालेल्या उमेदवारांना यूपीएससी /एमपीएससी सह डिफेन्समधील परीक्षांनंतर तेथील सेवांसाठी मोठी संधी असते.

त्यांना सहाय्यक सरकारी वकील किंवा सरकारी वकील होण्याचा पर्याय देखील आहे. या शिक्षणानंतर कायदेशीर सल्लागार बनता येते. कायदाविषयक संस्था, खाजगी कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या किंवा बँकांमध्ये विविध कायदेशीर बाबींवर सल्ला देण्याची जबाबदारी मिळते.

कायदेशीर विश्लेषक विविध कायदेशीर दस्तऐवज तयार करू शकतात आणि वकिलांनादेखील मदत करतात.

अनेक ॲडव्होकेट हे राजकीय क्षेत्रात करिअर करतात. कॉर्पोरेट काऊंसेलर्स कॉर्पोरेट्सना पूर्ण वेळ समुपदेशक म्हणून काम करून सल्ला देतात. सायबर लॉनंतर सायबर सहाय्यक, सायबर वकील किंवा सायबर सुरक्षा फॉरेन्सिक तज्ज्ञ आदी पदांवर करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com