आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट : इंजिनिरिंग क्षेत्रातील या आहेत करिअर संधी

Artificial Intelligence and Robots
Artificial Intelligence and Robots

आर्टिफिशियल इंटेलिजन्स व यंत्रमानव हे आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचे परवलीचे शब्द असतील व त्यांनी जीवनातील सर्वच क्षेत्रे व्यापलेली दिसतील. या प्रवाहात मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि आयटी शाखांमधील व रोबोट च्या पार्टस मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीचा वाटा आहे.

काय आहे हा झंझावात
यंत्र मानव बऱ्यापैकी सर्वांनी या ना त्या रूपात पाहिलेले आहे. सर्वात साधा रोबोट खेळण्यातला. त्या खेळण्यात ठराविक क्रिया प्रोग्रॅम केलेल्या असतात, त्याप्रमाणे ते बॅटरी वर चालतात आणि प्रगत रूप म्हणजे पहिला मानवी रोबोट सोफिया. चालणे बोलणे व वागण्यापर्यंत चक्क मानवी प्रतिकृती! वाहन निर्मिती सारख्या अवजड उद्योगात 90 टक्के कामे रोबोटिक्सच्या मदतीने केल्या जातात.

आता प्रश्न राहतो तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. बुद्धिमत्ता कृत्रिमपणे निर्माण होऊ शकते का? तंत्रज्ञानातील प्रगतीममुळे याचे उत्तर 'होय' आहे. याच्या मदतीने मशीन्समध्ये मनुष्यासारखे आकलन आणि  निर्णयक्षमता निर्माण होऊ शकते. मशिनला ठराविक कामासाठी प्रोग्रॅम करून एकाच पट्टीतील कामे करून घेताना कित्येक स्वयंचलित यंत्रणा आपण पहिल्या आहेत; पण ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. मग मानवी कार्यक्षमता असणाऱ्या मशीन कोणत्या? तुम्ही 2015  मध्ये प्रदर्शित चॅपी हा सिनेमा पाहिलाय? त्यात रोबोट कार्यान्वित केल्यावर मानवी शिशु प्रमाणे थोडे आवाज, शब्द संग्रहित करतो, त्याचा उच्चार करतो. त्यानंतर शब्दसाठा वाढवून छोटी वाक्य निर्माण करतो. पुढची पायरी संभाषण. रोबोट समर्पक उत्तर द्यायला लागतो आणि शेवटी कहर म्हणजे तो आपल्या संपर्कातील लोकांच्या सवयी आचरणात आणतो. हीच ती कृत्रिम बुद्धिमत्ता !

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसं चालते कार्य 
रोबोटिक्स : रोबोट हे ठरवून दिलेली कामे न  थकता अचूकपणे करू शकतात. मोटार कंपनीमध्ये रोबोट वेगवेगळे  पार्टस उचलणे, जोडणे आणि टेस्ट करणे अशी कामे करताना आपण पाहतो. यांसारख्या विशिष्ट कामांसाठी विशिष्ट रोबोट तयार केले जातात. त्यासाठी बाहू (आर्म्स), जोड(जॉइंट्स) आणि दृष्टी (कॅमेरा व्हिजन) सारख्या आवश्यक भागांची रचना केली जाते. त्याच्या हालचालीसाठी मोटर जोडल्या जातात. नंतर योग्यवेळी, योग्य कामासाठी संबंधित भाग कार्यान्वित करण्यासाठी पीएलसी कंट्रोलर व प्रोग्रामिंग चा वापर होतो. एचएमआय आणि स्कॅडा हे त्यातील आधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे रोबोटचे दूरस्थ संचलन होऊ शकते. 

आता पाहूया मशीनमध्ये कशी निर्माण करतात कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यासाठी एक उदाहरण घेऊ, अंगठ्याच्या ठशांवरून व्यक्तीची ओळख पटवणे. यात हे लक्षात घ्या कि प्रत्येकाच्या ठशाला ठराविक पॅटर्न आहे, ते मशीन मध्ये जतन केली जातात. आता ज्या व्यक्तीची ओळख पटवायची, त्याच्या ठशाची तुलना जतन केलेल्या पॅटर्न सोबत केली जाते. हे तसे चाकोरीबद्ध काम आहे. आता त्यापेक्षा थोडे अवघड काम म्हणजे मशीनने चेहऱ्यावरून व्यक्ती ओळखणे. यांतही संबंधित व्यक्तींचे छायाचित्रे जतन केलेली असतात. पण काही नैसर्गिक कारणे व वय, केशरचना, दाढी, टोपी, मास्क, गॉगल चष्मा‌ यामुळे चेहऱ्यातील बदल हे मशीनने ओळखताना चुका होऊ शकतात. आपण मानव मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या बदलासोबतही ओळख पटवू शकतो. मग आता त्या मशीनला  एकाच व्यक्तीची अनेक छायाचित्र देऊन ट्रेन करावे लागेल आणि पुढची पायरी म्हणजे अलोगॉरिथमची निर्मिती. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यातील असे लहानमोठे बदल मशीन स्वतः मानवाप्रमाणेच आत्मसात करून अचूक ओळख पटवू शकेल.

समजा, तुम्ही कुठले संभाषण ऐकत आहेत, त्यावेळी एखादा शब्द जरी ऐकू आला नाही किंवा उच्चार अस्पष्ट असतील तरी मानवी बोधक्षमता तसेच भाषेच्या ज्ञानामुळे  वाक्याचा अर्थ काढू शकता. मग अशीच बुद्धिमत्ता भाषेच्या ट्रेनिंगद्वारे मशीन ला प्रदान केल्यास दृकसंभाषणाचे (ऑडिओ स्पीच) अचूक लिखित शक्य आहे. 

कुठे वापरले जाऊ शकते
मुळात वरील दोन्ही तंत्रज्ञान कुठे वापरल्या जाऊ शकणार नाही, हा प्रश्न पडावा इतपत या क्षेत्रांची महत्ता आहे! काही उदाहरणे: प्रगत इलेक्ट्रॉनिक्स करमणुकीच्या साधनात ग्राहकाला त्याच्या आवडीप्रमाणे  कार्यक्रमाची योजना, ग्राहकाला त्याच्या आवडीप्रमाणे शॉपिंग हिंट देणे हि कृत्रिम बुद्धिमत्तेची साधी उदाहरणे. साईट कशी ओळखते तुमची आवड? तर आपल्या ब्राउजिंग डेटा, ऑनलाईन खरेदी याच्या आधारे मशीन ट्रेन होत असते आणि नेमकेपणे आपल्याला पर्याय सुचले जातात. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स फिटनेस प्रॉडक्ट्स(बेल्ट) आलेत, ते आपल्या शरीराचे रिडींग घेते व दीर्घकालीन भल्यामोठ्या माहितीच्या आधारे आरोग्यविषयक सूचना देते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती मुले याच्यावर लक्ष ठेवणे, त्यांना सूचना देणे, धोक्यापासून सजग करणे,  त्यांना व पालकांना सूचना देणे, हि कामे सुद्धा ट्रॅकिंग बेल्टने शक्य आहेत.

तुम्ही अशा घरात राहण्याची कल्पना करू शकता जिथे कृत्रिम‌ बुद्धिमत्तेवर आधारित स्वीय्य सहाय्यक, तुमच्या सर्व कामांची काळजी घेईल. नित्य गरजेप्रमाणे स्वतः किंवा तोंडी आदेशाप्रमाणे तुमचे शेड्युल तयार करणे, संबंधितांना फोन करून मिटिंग आयोजित करणे, दार लावून घेणे, विजेची उपकरणे चालू बंद करणे, घरात लागणाऱ्या उपयोगी वस्तूंची ऑर्डर पाठवणे, फक्त झोप तुम्ही तुमची घ्यायचे काम. रोबोटिक्स तुमच्यासाठी घरकामांपासून तर बाहेरील कामात मदतीसाठी साधन आहे.
- प्रा. विजय सरदार (जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हडपसर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com