वाणिज्य शाखेतील संधी

आजच्या गतिशील अर्थव्यवस्थेत वाणिज्य (कॉमर्स) हा महत्त्वाचा घटक बनला आहे.
Career Opportunities in the Commerce Field
Career Opportunities in the Commerce Fieldsakal
Updated on

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

आजच्या गतिशील अर्थव्यवस्थेत वाणिज्य (कॉमर्स) हा महत्त्वाचा घटक बनला आहे. मात्र, दहावीपर्यंत वाणिज्य विषयांची फारशी तोंडओळख नसल्याने, ती निवडताना सुरुवातीला गोंधळ निर्माण होतो. विज्ञान घ्यायचे नाही व आर्ट्सला जायचे नाही, म्हणून वाणिज्य शाखा निवडणारे अनेक विद्यार्थी असतात.

वाणिज्य शाखेतील करिअर संधीबद्दल योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक विद्यार्थी दहावीनंतर केवळ पारंपरिक पर्यायांकडेच लक्ष केंद्रित करतात. परंतु, संख्यात्मक क्षमता, व्यावहारिक दृष्टिकोन आणि व्यवस्थापन कौशल्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध आहेत.

वाणिज्य म्हणजे केवळ सीए नव्हे!

सामान्यत- वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात असतो. मात्र, याशिवायही बीकॉम (ऑनर्स), बीबीए, बीसीए, अर्थशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, डिझाईन, फाईन आर्ट्स आणि लॉ यासारख्या विविध अभ्यासक्रमांच्या संधी या शाखेत उपलब्ध आहेत. पदवीनंतर एमबीए, सीएफए, सीएमए, सीएस, एफआरएम, स्पर्धा परीक्षा, बँकिंग आणि इन्शुरन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करता येते.

प्रमुख करिअर पर्याय

1) चार्टर्ड अकाउंटंट - आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय.

2) कंपनी सेक्रेटरी - कॉर्पोरेट कायदा आणि नियामक बाबींच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा अभ्यासक्रम.

3) अॅक्च्युअरियल सायन्स हा अभ्यासक्रम आहे जो गणित आणि संख्याशास्त्राचा वापर करून जोखमीचे मूल्यांकन व व्यवस्थापन करतो.

4) चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट - गुंतवणूक व्यवस्थापन आणि वित्तीय विश्लेषणासाठी महत्त्वाची पदवी.

5) फायनान्शिअल रिस्क मॅनेजर - बँकिंग, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूक आणि वित्तीय सेवा क्षेत्रात उत्तम संधी.

6) सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट - धोरणात्मक आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन लेखापरीक्षणासाठी उपयुक्त कोर्स.

7) सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट - आंतरराष्ट्रीय स्तरावर कर सल्ला आणि वित्तीय नियोजनाच्या संधी.

8) डिजिटल मार्केटिंग, स्टॉक मार्केट ट्रेडिंग, ई-कॉमर्स स्ट्रॅटेजी आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्येही उत्तम संधी आहेत.

9) असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट (ACCA) - १८० हून अधिक देशांमध्ये मान्यताप्राप्त ही जागतिक पात्रता आहे. फायनान्स, अकाउंटिंग किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसीसीए’ चांगला पर्याय आहे.

नव्या युगातील वाणिज्य शिक्षण

परंपरागत अभ्यासक्रमांबरोबरच डेटा अॅनालिटिक्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. वाणिज्य विद्यार्थ्यांनी तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि उद्यमशील कौशल्ये विकसित केली पाहिजेत. इंटर्नशिप आणि प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळवणे हे यशस्वी करिअरसाठी महत्त्वाचे ठरते.

गणिताचा अभ्यास महत्त्वाचा!

अनेक विद्यार्थी वाणिज्य शाखेत गणित न घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, सीए, सीएफए, एफआरएम आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारख्या क्षेत्रांमध्ये गणित आवश्यक ठरते. अकरावीच्या गुणांना महत्त्व दिले जात नसल्याने अकरावी हे ‘विश्रांती’चे वर्ष वाटते. परंतु काहीशे जागा उपलब्ध असणाऱ्या आयपीमॅटसारख्या प्रवेश परीक्षेसाठी दोन वर्षाची उत्कृष्ट कामगिरी लागते. त्यासाठी सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, भाषिक क्षमता, आणि तर्कशक्ती यावर भर द्यावा लागतो.

निष्कर्ष

वाणिज्य क्षेत्र व्यावसायिकता, वित्तीय व्यवस्थापन आणि तांत्रिक कौशल्ये यांचा उत्तम संगम आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि पारंपरिक संधींचा विचार करून करिअर घडवले, तर वाणिज्य शाखेत मोठे यश मिळवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com