
प्रा. विजय नवले
भारताचा भूगोल, नद्या, पर्वत, विविध प्रकारचे भूभाग, जगातील इतर भागांतील भौगोलिक प्रदेश, हवामानाचे प्रकार, नकाशे असे सगळे पाहून असे वाटते की, प्रत्यक्ष तिथे जाऊन यावे. आकलनाच्या दृष्टीने अनेकांना भूगोल सोपा विषय वाटतो. त्यामुळे पुढे जाऊन यातच शिक्षण घ्यावे असे शाळेत असताना वाटते. अशा मंडळींसाठी भूगोलातील पदवी शिक्षण हा पर्याय आहे. बी.ए. भूगोल आणि जमल्यास त्यातील स्पेशलायझेशन असलेले उच्च शिक्षण घेतल्यास आवडीच्या क्षेत्रातील करिअर करता येईल.