
आता शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण हा सक्तीचा विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. पण या क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तुम्हाला शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम घ्यावा लागेल. चला तर मग या क्षेत्राशी संबंधित माहिती जाणून घेऊया...
कोरोना काळात सर्वांना आरोग्याचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे लोकांचं चांगलं आरोग्य ठेवण्यावर भर दिसत आहे. अनलॉकनंतर जिममध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता जिम ट्रेनर (शारीरिक शिक्षण) हे करिअरदृष्ट्या चांगले क्षेत्र ठरत आहे. तसेच शारीरिक शिक्षणचा कोर्स केल्यानंतर आपण बऱ्याच कंपन्या, संस्था आणि शाळांमध्ये काम करू शकतो.
आता शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण हा सक्तीचा विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. पण या क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तुम्हाला शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम घ्यावा लागेल. चला तर मग या क्षेत्राशी संबंधित माहिती जाणून घेऊया...
कोर्ससाठी पात्रता काय?
शारीरिक शिक्षणात पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी आपल्याकडे कोणत्याही विषयात बारावी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, शारीरिक शिक्षणात पदवी प्राप्त केलेले उमेदवार शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करू शकतात.
कोर्स कुठं करता येईल?
शारीरिक शिक्षणाशी संबंधित कोर्सेस देशातील अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. यात इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान संस्था (दिल्ली), कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन (पुणे), ऍमिटी स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस सायन्स (नोएडा) आदी प्रमुख संस्था आहेत.
शारीरिक शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम
- सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन
- डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन
- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
- मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन
करिअरचे पर्याय
शारीरिक शिक्षणाचा कोर्स घेतल्यानंतर आपण आता स्पोर्टस ऍकॅडमी, हेल्थ क्लब, शाळा, कॉलेजमध्ये नोकरी करू शकता. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमानंतर आपण बऱ्याच प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतो.
- शिक्षक
- प्रॉफेसर
- स्पोर्टस व्यवस्थापक
- फिजिकल ट्रेनर
- प्रशिक्षक