Career Resilience Essential Tips: करिअरच्या प्रवासात अडचणी, अन्याय आणि प्रतिकूल परिस्थिती येतातच. त्या स्वीकारून त्यावर मात कशी करावी याविषयी काही कानमंत्र बघूया..देऊ नका.  स्वतःबाबत करुणाभाव ठेवा : स्वतःलाच ‘मीच अयशस्वी झाले’ असे म्हणणे बंद करा. स्ट्रॅटेजिक पॅरिवर्तन करा  लढाईची निवड : प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लढाई देणे शक्य नसते आणि शहाणपणाचेही नाही. तुमची ऊर्जा कोणत्या लढाईसाठी महत्त्वाची आहे ते ठरवा.  हुशारीने कामे करून घ्या : कधी कधी थेट संघर्ष करण्यापेक्षा तुमचे काम अशा पातळीवर.भावनिक लवचिकता विकसित करा स्वतःच्या मूल्यांवर विश्वास : नकार, टीका किंवा अपयश हे तुमच्या क्षमतेवर झालेला हल्ला नसून, एका विशिष्ट परिस्थितीचा परिणाम आहे हे समजून घ्या. स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवा. भावनांचे व्यवस्थापन करा : निराशा, राग, दुःख या भावना येणे स्वाभाविक आहे; पण त्यांना तुमच्या निर्णयावर स्वार होऊ.करून दाखवा की टीका करणाऱ्यांचे तोंड बंद व्हावे. तुमच्या कामातूनच उत्तर द्या.  प्रतिकूलतेतून शिकणे : प्रत्येक अडचण ही एक शिक्षणाची संधी आहे. ती तुम्हाला सध्याच्या नोकरीत राहायचे की नवी संधी शोधायची हे ठरवण्यास मदत करू शकते. नेटवर्क मजबूत करा  मेंटॉर शोधा : तुमच्यापेक्षा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. त्यांचा सल्ला मौल्यवान ठरतो. . सहकारी आणि मित्र : सकारात्मक विचारांच्या सहकाऱ्यांशी आणि मित्र-मैत्रिणींशी संपर्कात रहा. दस्तावेजीकरण आणि व्यावसायिकता जेव्हा प्रतिकूलता व्यक्तिनिष्ठ किंवा गैरव्यावहारिक स्वरूपाची असते.  सर्व काही लिहून ठेवा : कोणतीही प्रतिकूल घटना घडल्यास तिच्या तारखा, वेळ, साक्षीदार आणि इतर तपशील नेहमीच नोंदवून ठेवा. हे दस्तावेज भविष्यात अमूल्य ठरू शकतात.  व्यावसायिकता राखा : तुमची व्यावसायिकता.डगमगू देऊ नका. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी, तथ्यांवर आणि तर्कावर बोला. आत्मविश्वासाचे दर्शन  आत्म-प्रशंसा करा : तुमचे यश, कौशल्य लपवू नका. तुमच्या योगदानाचे श्रेय नक्की घ्या.  ‘नाही’ म्हणायला शिका : सीमा ठरवणे आणि ‘नाही’ म्हणणे हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. .AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!.दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा  तुमचे लक्ष्य स्पष्ट करा : तुमचे अंतिम ‘करिअर उद्दिष्ट’ काय आहे? सध्या तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, ती त्या उद्दिष्टाच्या दिशेने जात आहे का? नसल्यास, बदलाचा विचार करा. संधी शोधत राहा : तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी काय चालले आहे, यावरच तुमचे संपूर्ण स्थैर्य अवलंबून ठेवू नका. .नेहमीच बाजारातील संधींबाबत माहिती ठेवा.  शक्तिस्थान शोधा : तुमच्या आवडीचे काम, उद्योग, कंपनी किंवा टीम कोणती आहे? जेथे तुमचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व योग्य रीतीने दखल घेतले जाईल अशा जागेचा शोध घ्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.