

Defining Success: Beyond Degrees and Financial Wealth
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानस तज्ज्ञ
मानसवेध
यशस्वी करिअर झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल तर झेपेल, रुचेल अशा व्यावसायिक पदवीची, करिअरची निवड आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास. तो योग्य न झाल्यास कुठल्याही विद्यापीठाची कितीही मोठी पदवी मिळाली तरी समृद्ध आयुष्य जगायला ती अपुरीच पडते. मुळात करिअर करायचं कशासाठी, तर बुद्धिमत्तेला, स्वत:तल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी. पैसा, प्रतिष्ठा ही उद्दिष्ट ओघानं येतात. लहानपणापासून विकासाची सुरवात होते.