करिअर वेध : जगा वर्तमानात

भूतकाळाच्या ओझ्याऐवजी वर्तमानाचा स्वीकार; सकारात्मक दृष्टिकोन, मनाचा निग्रह आणि नियोजनातून आनंदी, समाधानकारक आयुष्याची वाट
A young professional embracing the present moment while balancing career goals and future planning.

A young professional embracing the present moment while balancing career goals and future planning.

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

मनुष्य स्वभाव विचित्र असतो. अनेकदा आपल्या हातून आनंदाचे क्षण सुटून जातात तसेच कारण नसताना नैराश्य ओढवून घेतले जाते. आपल्या आयुष्यात आनंद व समाधानाने जीवन जगणे महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस यापासून दूर होत चालला आहे. एक गोष्ट खरी आहे सध्या अनेक कारणांनी प्रत्येक माणूस खूप चिंतेत असतो, त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अनेक प्रकारचे ताणतणाव सहन करावे लागत आहेत. त्यामुळे सुखाचे, आनंदाचे आणि समाधानाचे क्षण आणि प्रसंग कमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आजच्या घडीला माणसाला आनंद शोधावा लागतो आहे, या सगळ्यांचे एक प्रमुख कारण ‘आपण वर्तमानात जगायला शिकले पाहिजे.’ माणसाने भूतकाळात जास्त न रमता वर्तमानात जगायला शिकले पाहिजे आणि त्याचवेळी भविष्याचे चांगले नियोजन केले पाहिजे. आयुष्याकडे बघताना अनेकदा लोक भूतकाळातील अपयश काही अप्रिय घटनांचे ओझे मनात खूप काळ धरून ठेवतात व त्यामुळे वर्तमानातील आनंदाचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाचेही आनंदाचे वातावरण राहत नाही. वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करणे हे आजच्या जगात खूप महत्त्वाचे बनले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com