करिअर वेध : संयम : मनावरील ताबा

करिअर, क्रीडा, कुटुंब आणि समाज या सर्व क्षेत्रांत संयम, मनावरील ताबा आणि परिपक्वतेचे महत्त्व अधोरेखित करणारा मार्गदर्शक विचार
Patience in Career

Patience in Career

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगले व्यक्तिमत्त्व टिकवण्यासाठी, समाजात स्थान मिळवण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचा घटक हा संयम आहे. तुमचा मनावरील ताबा आणि संयम हे दोन गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वात अग्रभागी असावेत. आपण योग्य वेळेपर्यंत संयम ठेवणे महत्त्वाचे असते, परंतु योग्य वेळी संयम सोडणे यात देखील काही गैर नाही. संयम सुटणे हा मनुष्य स्वभाव आहे, परंतु संयम सुटल्यावर आपण कसे वागतो, काय करतो, कसे बोलतो, निर्णय कसे घेतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणसाची सहनशीलता वेगळी असते व त्याप्रमाणे त्याचा संयम टिकतो किंवा संपतो. योग्य वेळेपर्यंत संयम टिकवणे ही गोष्ट खूप अवघड आणि महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com