विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध; 'या'तारखेपर्यत करा अर्ज : Caste Certificate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Barti

जात पडताळणीसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध; 'या' तारखेपर्यत करा अर्ज

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

जात पडताळणीसाठी (Caste Certificate) अर्ज केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या विद्यार्थ्यांना ऑनलाइन बरोबरची ऑफलाइन ही अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना वारंवार अडथळे येत असल्याने राज्यातील विद्यार्थी त्रस्त झाले होते. त्यामुळे आता त्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे.

राज्यात विविध शाखेच्या प्रवेश प्रकिया सुरू झाल्या आहेत .बारावी नंतर प्रवेश घेणाऱ्या विविध शाखांची सध्या प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. त्यामध्ये जात पडताळणीचा अर्ज हा अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र सादर होणे आवश्यक असते. बार्टीने जात पडताळणी अर्जाबाबत नवीन आदेश जारी केला आहे. दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करण्यासाठी बार्टीकडे विनंती केलेली होती.

सध्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रकिया सुरु असून, उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही बार्टीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

loading image
go to top