परीक्षेत कॉपी कराल तर याद राखा! वाचा CBSE चा नवा मास्टर प्लॅन! | CBSE Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cbse exam

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी CBSE चा नवा मास्टर प्लॅन | CBSE Exam

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE board exam) दोन टर्ममध्ये परीक्षा होणार आहेत. या दरम्यान परीक्षांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात अशा कोणत्याही गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सीबीएसईकडून योग्य उपाययोजना करणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि CBSE द्वारे आयोजित बोर्ड परीक्षांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी हा प्लान तयार केला जाणार आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो याद राखा...CBSE ने एक नवा मास्टरप्लान तयार केला आहे.

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी CBSE चा नवा मास्टर प्लॅन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षांमध्ये निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी Advanced Data Analytics वापर करेल. यासोबतच अशा परीक्षा केंद्रांचीही ओळख पटवली जाईल. जिथे कॉपी किंवा अनुचित पद्धतींचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात सीबीएसईचे संचालक जोहरी म्हणाले की, परीक्षेदरम्यान अनुचित मार्गांचा वापर होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बाह्य निरीक्षकांची नियुक्ती, उड्डाण पथके आणि सीसीटीव्हीच्या मदतीने देखरेख करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जोहरी म्हणाले की, सीबीएसईचे उद्दिष्ट आहे की अशा परीक्षा केंद्रांची ओळख पटविण्यासाठी असे विश्लेषण करणे, जेथे डेटा दर्शविते, परीक्षेदरम्यान गैरप्रकार होतात

हेही वाचा: गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह एकाला अटक; पाकिस्तान कनेक्शन?

परीक्षेदरम्यान अनुचित माध्यमांचा वापर होण्याची दाट शक्यता

CBSE चे संचालक म्हणाले, परीक्षेदरम्यान अनुचित माध्यमांचा वापर होण्याची दाट शक्यता असून केंद्रे ओळखण्यासाठी आधुनिक डेटा विश्लेषणाचा वापर करून यामध्ये आणखी सुधारणा करण्याचे ठरवले आहे." परीक्षार्थींचा संशयास्पद डेटा ट्रेंड ओळखण्यासाठी स्क्वेअर फाउंडेशन आणि प्लेपॉवर लॅब यांच्या सहकार्याने जानेवारी 2021 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या डेटाचे प्रायोगिक तत्त्वावर विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार आता कॉपी पडकण्यात मदत होणार आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या माजी सैनिकाचा भारतात पद्म श्री पुरस्काराने सन्मान

loading image
go to top