

How to check your 10th result step-by-step using official websites, SMS, DigiLocker, and UMANG app with direct access links and easy instructions.
sakal
How to Check CBSE Class 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल आज 15 एप्रिल 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर केला आहे. 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परिक्षेचा निकाल आता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून विद्यार्थी आपले मार्क ऑनलाइन पाहू शकतात.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तो पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट्स, SMS याव्यतिरिक्त डिजीलॉकर आणि उमंग अॅपच्या माध्यमातूनही विद्यार्थी आपला निकाल आणि मार्कशीट पाहू शकतात आणि डाउनलोडही करू शकतात.