CBSE : सीबीएसईच्या नावाचा, लोगोचा गैरवापर करणाऱ्या हॅण्डल्स्‌ची यादी जाहीर

सीबीएसई नाव वापरून दिशाभूल करणाऱ्यांवर होणार कारवाई
CBSE name and Logo
CBSE name and Logosakal

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नावाचा गैरवापर करत सोशल मीडियावर विविध लोगो आणि हॅण्डल तयार करणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोशल मिडियावर सीबीएसईच्या लोगोचा आणि नावाचा गैरवापर करत नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

‘सीबीएसई’च्या नावाचा किंवा लोगोचा गैरवापर करत नागरिकांना फसविणाऱ्या हॅण्डलची यादी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. ‘एक्स’ (यापूर्वीचे नाव ट्विटर) या सोशल मीडिया साइटवर हे हॅण्डल वापरून पोस्ट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या हॅण्डलवर सीबीएसईचे नाव किंवा तत्सम लोगो असला तरीही हे सीबीएसईचे अधिकृत हॅण्डल नाही, याची दक्षता नागरिकांनी विशेषत: पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करत तोतयागिरी किंवा चुकीची माहिती पसरविणाऱ्या ३० ‘एक्स’ हॅण्डलची यादी मंडळाने जाहीर केली आहे. दरम्यान, दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या संबंधित हॅण्डल्स्‌वर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

‘सीबीएसई’चे अधिकृत हॅण्डल -

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत आणि प्रमाणित ‘@cbseindia29’ हे एक्स हॅण्डल आहे. या हॅण्डल व्यतिरिक्त नागरिकांनी कोणत्याही अन्य हॅण्डल अधिकृत समजू नये. सीबीएसईच्या अधिकृत हॅण्डल व्यतीरिक्त सोशल मिडियावरील सीबीएसईच्या नावाचा किंवा लोगोचा वापर करून केलेल्या हॅण्डलवरील माहितीमुळे नागरिकांची फसवणूक झाल्यास, त्याला सीबीएसई जबाबदार राहणार नाही,’’ असे सीबीएसईने अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com