CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Students
CBSE Studentsfile photo

CBSE Board 10, 12 board exams : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. इम्प्रूव्हमेंट, कंपार्टमेंट, प्रायव्हेट आणि पत्राचार परीक्षा होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 25 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहेत. खासगी आणि सरकारी शाळांमध्ये परीक्षा एकाचवेळी होणार आहेत. सर्व सीबीएसई विद्यार्थांसाठी या परीक्षांच्या तारखा आहेत.

सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी वेळापत्रकाबाबत अधिक माहिती घेऊ शकतात. यंदा दहावीचा निकाल 3 ऑगस्ट तर बारावीचा निकाल 30 जुलै रोजी सीबीएसईने जाहीर केला होता. कोरोना महामारीमुळे यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मूल्यांकनाच्या आधारावर बोर्डाने विद्यार्थांना गुण दिले होते. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षासाठीची नोंदणी 10 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

CBSE Students
…म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर PM मोदींचा फोटो; केंद्राने दिलं उत्तर

सर्वोच्च न्यायालयाला सीबीएसई बोर्डाने परीक्षांच्या तारखासंदर्भात माहिती दिली होती. 19 मुख्य विषयांसाठी ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या आधारावरच निकाल जाहीर केला जाईल. दहावीच्या ऑफलाईन पेपरचा कालावधी तीन तासांचा असेल. इंग्रजी, गणित, विद्यान आणि इतर सर्व विषयांसाठी तीन तासांचा अवधी असणार आहे. Information Technology आणि Computer Applications या पेपरसाठी दोन तासांचा अवधी असेल. बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पेपरचा कालावधीही तीन तासांचा असेल. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पेपर घेतले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com