CBSE Result : दहावीत ९४.९० टक्के, तर बारावीत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.९० टक्के विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSE
CBSEsakal media
Summary

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.९० टक्के विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.९० टक्के विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईतर्फे शुक्रवारी सकाळी बारावीचा, तर दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइनद्वारे घोषित करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत देशातील १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर २० लाख ९३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यातील १९ लाख ७६ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर, तसेच आयसीएसईच्या दहावीच्या निकालानंतर सर्वांना प्रतीक्षा लागली होती ती सीबीएसईच्या परीक्षेच्या निकालाची. शुक्रवारी अखेर ही प्रतीक्षा संपली. सीबीएसईने शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच बारावीचा निकाल घोषित केला. त्यानंतर दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला. देशातील २२ हजार ७३१ शाळांमधून तब्बल २१ लाख नऊ हजार २०८ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती.

सीबीएसईच्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश होत असून येथील दहावीचे ९७.४१ टक्के आणि बारावीचे ९०.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीचा निकाल

दहावीच्या २०२० मधील निकालाच्या तुलनेत २०२२चा निकालात २.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२०मध्ये दहावीचा निकाल ९१.४६ टक्के लागला होता. परदेशातील शाळांमधून २४,८४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील २४ हजार १६९ विद्यार्थी म्हणजेच ९७.२९ टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. परीक्षा दिलेल्या ९५.२१ टक्के विद्यार्थिनी, तर ९३.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी विद्यार्थ्यांच्या तुलनेत १.४१ टक्क्यांनी जास्त आहे.

बारावीचा निकाल

बारावीच्या २०२० मधील निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल ३.९३ टक्क्यांनी वाढला आहे. २०२० मध्ये ८८.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परदेशातील शाळांमधून १८ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, त्यातील १७ हजार ६४४ विद्यार्थी (९३.९८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत ९४.५४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.२९टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची गेल्या काही वर्षातील टक्केवारी

वर्ष : दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

२०१९ : ९१.१० टक्के : ८३.४० टक्के

२०२० : ९१.४६ टक्के : ८८.७८ टक्के

२०२१ : ९९.०४ टक्के : ९९.३७ टक्के

२०२२ : ९४.४० टक्के : ९२.७१ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com