सीडीएस-२ परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Results

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) वतीने तिन्ही दलांमध्ये अधिकारी पदासाठी घेण्यात येणारी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२ (सीडीएस) चा निकाल शुक्रवारी (ता. २३) युपीएससच्या अधिकृत संकेस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

सीडीएस-२ परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) वतीने तिन्ही दलांमध्ये अधिकारी पदासाठी घेण्यात येणारी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२ (सीडीएस) चा निकाल शुक्रवारी (ता. २३) युपीएससच्या अधिकृत संकेस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या लेखी परीक्षेत सहा हजार ६५८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, पुढील सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीसाठी ते पात्र ठरले आहेत.

युपीएससी वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए), नेव्हल अकॅडमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) तसेच एअर फोर्स अकॅडमी सारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये उमेदवारांची निवड केली जाते. ही प्रवेश प्रक्रिया पुरुष व महिला उमदिवरांसाठी घेतली जाते.

निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. प्रत्येक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणाचा कालावधी वेगळा असतो.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित दलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत एसएसबीसाठीच्या तारखा आणि शहर निवडण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरले नाही त्यांची गुणपत्रिकेबाबत विशेष सूचना युपएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सीडीएसचा निकाल तसेच निकलाशी निगडित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

Web Title: Cds 2 Exam Result Declare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..