
CBSE 2022 12th Exam Result Out : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज, 22 जुलै 2022 रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून बघाता येणार आहे. याशिवाय digilocker.gov.in आणि results.cbse.nic.in यावरही बघता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाकावा लागणार आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSE तर्फे यावर्षी 26 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSE च्या इयत्ता 12 टर्म 2 च्या परीक्षेत बसले होते. परिक्षेनंतर लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर आता या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण मिळणे आवश्यक आहे.
असा पाहा निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे. येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदींची माहिती प्रविष्ट करून सबमिट करा. यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचा परीक्षेचा निकाल दिसून येईल.