esakal | पावसामुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा 'परीक्षा' घेणार; CET सेलची माहिती I CET Exam
sakal

बोलून बातमी शोधा

 CET

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone ) मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय.

पावसामुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा 'परीक्षा' घेणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone ) मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसतोय. मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. यामुळं जनजीवनही विस्कळीत झालंय. या पावसामुळं शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचं देखील मोठं नुकसान होताना दिसतंय. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय. 200 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय, तर विद्यार्थ्यांनी आम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळावी, अशी मागणी केलीय. ही परीक्षा 20 तारखेपासून 1 तारखेपर्यंत सुरू आहे. काल ज्यांचे पेपर होते त्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असून आजही अनेक विद्यार्थ्यांना या मुसळधारेचा फटका बसलाय.

हेही वाचा: 'TET' परीक्षाही पुढे ढकलणार; सरकारकडून आज अंतिम घोषणेची शक्यता!

कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका

राज्यात जोरदार पाऊस कोसळत असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक गावांना याचा जबर फटका बसलाय. या पावसामुळं विद्यार्थ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय. दरम्यान, या पावसामुळं सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आलीय. ज्या विद्यार्थ्यांना काल आणि आज राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलकडे स्पष्ट केलंय.

हेही वाचा: हृदयविकाराला खरंच तेल, तुप घातक आहे? जाणून घ्या 'सत्य' कारण

दरम्यान, 'न्यासा' ही कंपनी मान्यताप्राप्त असून त्याच कंपनीच्या माध्यमातून सावर्जनिक आरोग्य विभागाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला घेतली जाणार आहे. त्यासाठी 31 ऑक्‍टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षाही (टीईटी) Teacher Eligibility Test 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंतिम घोषणा आज (बुधवारी) होणार असल्याचे समजतंय.

loading image
go to top