CET’ परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर

एमएचटी-सीईटीच्या परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता
cet exam
cet examsakal

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी किंवा त्याआधी जाहीर होणार आहे.

तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाइन आर्ट यामधील पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या जवळपास १६ सीईटी परीक्षांसाठी सुमारे ११ लाख ६३ हजार २७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रवेश परीक्षा होत असतानाच सर्व्हर व नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थी परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. तसेच राज्यात उद्‌भवलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशाप्रकारे सीईटी परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली

दरम्यान परीक्षा कक्षाने ‘एमएएच-ए. आर्च-सीईटी’ आणि ‘एमएएच-एम.एचएमसीटी-सीईटी’ या परीक्षा ऑगस्टच्या सुरवातीला झाल्या असून त्याचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले आहेत.

‘एमएचटी सीईटी’ची उत्तरसूची शुक्रवारी होणार उपलब्ध

‘‘अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेची उत्तरसूची विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (ता.१) त्यांच्या लॉगिंनमध्ये उपलब्ध होणार आहे. याचवेळी प्रश्नपत्रिका देखील संकेतस्थळावर देण्यात येतील. यावर काही आक्षेप असल्यास तो नोंदविण्यासाठी २ ते ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल (म्हणजेच स्कोअर कार्ड) १५ सप्टेंबर रोजी किंवा त्या आधी घोषित करण्यात येईल.’’

रवींद्र जगताप, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा/कालावधी पुढीलप्रमाणे:

तंत्रशिक्षणातंर्गत अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा

परीक्षेचे नाव : निकालाचा संभाव्य कालावधी

बी. प्लॅनिंग : २ सप्टेंबर

एमसीए : ७ सप्टेंब

एमएचटी-सीईटी (पीसीएम/पीसीबी) : १५ सप्टेंबर (याआधी देखील होऊ शकतो)

एमबीए : ७ सप्टेंबर

बी.एचएमसीटी : ७ सप्टें

उच्च शिक्षणातंर्गत अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा

परीक्षेचे नाव : निकालाचा संभाव्य कालावधी

बी.पी.एड : १० सप्टेंबर

बी.एड/एम.एड : १० सप्टेंबर

एलएलबी (५ वर्ष) : १० सप्टेंबर

एलएलबी (३ वर्ष) : १० सप्टेंबर

बी.ए. बी.एड/बी.एस्सी बी.एड : १० सप्टेंबर

बी.एड (जनरल/ स्पेशल), एम.पी.एड : १० सप्टेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com