CET Exam : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’चे अंतिम वेळापत्रक जाहीर

राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे.
CET Exam
CET Examsakal
Updated on

पुणे - राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार, ‘एमएचटी सीईटी’ ही पीसीबी गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल, तर पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान होणार आहे.

या परीक्षेसह अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी शिक्षण अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. तसेच काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देखील दिली आहे.

सीईटी सेलमार्फत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करणे सोईस्कर ठरते. आता टप्प्या-टप्प्याने होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अंतिम केले आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली आहे.

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा संभाव्य कालावधी :

  • एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीबी ग्रुप) : ९ ते १७ एप्रिल २०२५

  • एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम ग्रुप) : १९ ते २७ एप्रिल २०२५

अन्य महत्त्वाच्या परीक्षांचा कालावधी -

  • परीक्षा : कालावधी

  • एलएलबी (तीन वर्ष) : ३ आणि ४ मे

  • एमसीए : २३ मार्च

  • बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड : २८ मार्च

  • एम.एचएमसीटी : २७ मार्च

  • बी. डिझाइन : २९ मार्च

  • एमबीए/एमएमएस : १ ते ३ एप्रिल

  • एमएच- नर्सिंग : ७ आणि ८ एप्रिल

  • एलएलबी (पाच वर्ष) : २८ एप्रिल

  • बी.बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस/एमबीए इंटिग्रेटेड/एमसीए इंटिग्रेटेड : २९, ३० एप्रिल आणि २ मे

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

www.mahacet.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com